Full Width(True/False)

सॅमसंगचा Galaxy A42 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे. कंपनीने अचानक गॅलेक्सी ए४२ संबंधी माहिती शेयर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कंपनीने सध्या सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोनसंबंधी काही महत्त्वाचे फीचर्सची माहिती उघड केली आहे. कंपनी या फोनची किंमत, सर्व वैशिष्ट्यांची माहिती लाँचवेळी करणार आहे. वाचाः वाचाः सॅमसंगकडून पाठवण्यात आलेल्या प्रेस रिलीजच्या माहितीनुसार, आगामी गॅलेक्सी ए ४२ ५ जी मध्ये ६.६६ इंचाचा इनफिनिटा यू सुपर अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणार आहे. कंपनीने आतापर्यंत स्वस्त ५ जी स्मार्टफोनसंबंधी सध्या हीच माहिती दिली आहे. वाचाः वाचाः सॅमसंग गॅलेक्सी ए४२ ५जी संबंधी अनेक माहिती लीक झाली आहे. ३सी आणि सेफ्टी कोरिया सर्टिफिकेशन लिस्टिंगच्या माहितीनुसार, या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असणार आहे. नुकत्याच लाँच केलेल्या गॅलेक्सी एम ५१ मध्ये कंपनीने 7000mAh मोठी बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच लिस्टिंग वरून ही माहिती समोर आली आहे की, या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 690 प्रोसेसर दिला आहे. ५ जी कनेक्टिविटीला सपोर्ट करणारा हा क्वॉलकॉमचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन प्रोसेसर असणार आहे. सर्वात स्वस्त वनप्लस डिव्हाईसमध्ये चिपसेट असण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए ४२ ला गॅलेक्सी ए ५१ आणि गॅलेक्सी ए ७१ प्रमाणे ४ जीबी व्हेरियंटमध्येही लाँच केले जावू शकते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gUKMHZ