Full Width(True/False)

'रियामुळे सुशांतच्या अवतीभवती होतं ड्रग्जचं वातावरण'

मुंबई- प्रकरणाची चौकशा करत आहे. यासंदर्भात तपास यंत्रणेने अनेक लोकांची चौकशीदेखील केली. ड्रग्ज अँगलनेही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, सुशांतसोबत काम करणारे बरेच लोक ड्रग्ज घेण्यात आणि ड्रग्ज पुरवण्यात गुंतले असल्याचं सांगितलं. सुशांतची मॅनेजर असलेल्या श्रुती मोदीने दावा केला की सुशांतच्या घरी ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. चक्रवर्ती कुटुंब आणि कर्मचार्‍यांचं घेतलं नाव टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार श्रुती मोदीने बुधवारी मान्य केलं की सुशांतच्या लाइफस्टाइलमध्ये ड्रग्ज फार महत्त्वाचा भाग होता. रिपोर्ट्सनुसार श्रुतीने सीबीआयला सांगितलं की ती फक्त सुशांतचं काम करायची आणि तिचा मादक पदार्थांसंदर्भातील गोष्टींशी काही संबंध नाही. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि सुशांतचे कर्मचारी ड्रग्जमध्ये गुंतले होते. सुशांतला जबरदस्ती या सर्व गोष्टींमध्ये येण्यास भाग पाडलं जायचं. या घटनेबद्दलही श्रुतीला विचारण्यात आले प्रश्न मीडिया रिपोर्टनुसार, यापूर्वी रजत मेवतीने सीबीआयला सांगितलं होतं की, सुशांतने मार्च २०२० मध्ये श्रुती मोदीकडे रिया चक्रवर्तीचा खर्च नोंदवला गेला ते सर्व बँकेचे स्टेटमेन्ट मागितले होते. सुशांतला स्टेटमेन्ट देण्याऐवजी श्रुतीनने गुपचूप रियाला फोन केला आणि तिला तत्काळ घरी परत बोलावून घेतलं. रिया घरी आली आणि प्रकरण शांत झालं. याबाबत सीबीआयने श्रुती मोदीची चौकशीही केली. मात्र या विधानांना न्यायालयात नेलं जाणार की नाही किंवा दंडाधिकाऱ्यां पुढे सादर करण्यात येतील की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. श्रुतीच्या वकिलांनी घेतलं इम्तियाज खत्रीचं नाव दरम्यान, श्रुती मोदीचे वकील अशोक सरोवगी यांनीही अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी ड्रग्ज पुरवणात इम्तियाज खत्रीचं नाव घेतलं. या प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोदेखील तपास करत आहे. त्यांच्या पथकाने दोन संशयितांना पकडले आहे. सीबीआय, एनसीबी व्यतिरिक्त ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jLf6a1