Full Width(True/False)

Gionee M12 Pro स्मार्टफोन लाँच, ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेजची किंमत ७५०० रु.

नवी दिल्लीः जिओनीने मार्केटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक एन्ट्री लेवल सेगमेंटचा स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 4000mAh बॅटरी, मीडियाटेक प्रोसेसर आणि मल्टी-रियर कॅमेरा सेटअप यासारखे फीचर्स दिले आहेत. फोन व्हाइट आणि ब्लू ग्रेडियंट फिनिशमध्ये येत असून हा फओन सिंगल व्हेरियंटमध्ये येतो. वाचाः जिओनीचा हा फोन सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. चीनमध्ये या फोनची किंमत ७०० चिनी युआन म्हणजे ७ हजार ५०० रुपये किंमत आहे. हा फोन केवळ एका स्टोरेज मध्ये म्हणजे ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये येतो. भारतात हा फोन लवकरच लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचाः जियोनी M12 प्रो चे वैशिष्ट्ये फोन मध्ये 720x1520 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आणि 90.3 टक्क्यासोबत स्कीन-टू-बॉडी रेशियो येतो. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो P60 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. मेमरीच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकते. वाचाः वाचाः फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १६ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सोबत एक मोठा वाइड अँगल सेन्सर आणि एक मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh बॅटरी दिली आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येणाऱ्या या फोनमध्ये 3.5mm चा हेडफोन जॅक दिला आहे. ड्यूल स्टिरियो स्पीकर सोबतच्या या फोनमध्ये साईडला व्हॅल्यूम आणि पॉवर बटन दिले आहेत. तर फोनच्या लेफ्ट साईडला सिम स्ट्रे स्लॉट दिला आहे. हा फोन मेटल फ्रेमचा वाटतो. याच्या बॅक पॅनेलला खाल जिओनीचा लोगो दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/336GsAE