नवी दिल्लीः गुगलने आपल्या पेमेंट सर्विस साठी नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरला टॅप टू पे नाव दिले आहे. द्वारे युजर सोप्या पद्धतीने आपल्या कार्ड्सचा वापर करू शकतील. हे फीचर NFC इनेबल्ड पेमेंट टर्मिनल्स आणि ऑनलाइन मर्चेंट्स वापर करू शकतील. यासाठी कंपनीने Visa सोबत पार्टनरशीप केली आहे. वाचाः या बँकासोबत ग्राहक या फीचरचा वापर करु शकतील सध्या अॅक्सिस आणि एसबीआय युजर्स सुद्धा या फीचरचा वापर करू शकतील. तसचे कोटक आणि अन्य बँकांचे ग्राहकांना लवकरच या सर्विसचा वापर करता येणार आहे. हे फीचर युजर्ससाठी एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. तसेच आधीच्या तुलनेत सोप्या पद्धतीने कार्डचा वापर केला जावू शकतो. वाचाः गुगल पे अँड NBU इंडियाचे बिजनेस हेड सजीथ सिवानंदन यांनी सांगितले, आम्ही आमच्या ग्राहकांना सुरक्षित अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत. टोकनचा वापर हा चांगला आहे. त्यामुळे कोणताही धोका निर्माण होत नाही. कोटक आणि अन्य बँकांसोबत ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे. टोकन सोबत गुगल पे ग्राहकांना एनएफसी सक्षम अँड्रॉयड डिव्हाइस किंवा फोनचा वापर करून सुरक्षित पेमेंट करण्यास मदत मिळणार आहे. या सुविधेचा लाभ २५ लाखांहून अधिक व्यापारी संस्थांना होणार आहे. वाचाः असा करा फीचरचा वापर या फीचरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी गुगल पे अॅपवर कार्ड डिटेलची माहिती देऊन अॅड करा. त्यानंतर सेटिंग्समध्ये पेमेंट मेथड मध्ये जावून कार्ड अॅड करा. त्यानंर ओटीपी टाका. त्यानंतर कार्ड अॅक्टिवेट होईल. त्यानंतर तुम्ही NFC इनेबल्ड टर्मिनल्स वर पेमेंट सर्विसचा वापर करू शकाल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RQRHI0