मुंबई- बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आजचा (२६ सप्टेंबर) दिवस फार महत्वाचा आहे. अभिनेत्री ला शनिवारी सकाळी १० वाजता एनसीबीने बोलवलं आहे. आणि श्रद्धा कपूरही सकाळी १०.३० वाजता एनसीबी ऑफिसमध्ये पोहोचणार आहेत. शुक्रवारी रकुलप्रीत सिंगची चौकशी करण्यात आली. रिपोर्टनुसार, रकुलप्रीतने संपूर्ण दोष रिया चक्रवर्तीच्या माथी मारला. दरम्यान धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितीज प्रसादची एनसीबीने २० तासांपेक्षा जास्त चौकशी केली. शुक्रवारी रात्री त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. सारा अली खान आणि श्रद्धा कपूरने एनसीबीसमोर हजर राहण्यासाठी अजून थोडी मुदत मागितली आहे. एनसीबी गेस्टहाउसमध्ये पोहोचली दीपिका पादुकोण दीपिका दिलेल्या वेळेत एनसीबी गेस्टहाउसला पोहोचली. प्रश्न सुरू करण्यापूर्वी दीपिकाला NDPS अॅक्ट समजावला गेला. रिपोर्ट्सनुसार, प्रश्न विचारणाऱ्या टीमला केपीएस मल्होत्रा लीड करत आहेत. एनसीबी गेस्टहाउससाठी निघाली श्रद्धा कपूर एनसीबी गेस्ट हाऊससाठी रवाना झाली आहे. तिला सकाळी १०.३० वाजेपर्यंत एनसीबी गेस्ट हाऊस गाठायचे आहे. दीपिका आणि करिश्मा यांना समोरासमोर बसवून विचारले जातील प्रश्न एनसीबी दीपिकाच्या मॅनेजर करिश्माची आज पुन्हा चौकशी करणार आहे. करिश्माही एनसीबी गेस्ट हाऊससाठी रवाना झाली आहे. असं म्हटलं जातं की, करिश्मा आणि दीपिका पादुकोण यांना आज समोरासमोर बसवून प्रश्न विचारले जातील. रिपोर्ट्सनुसार, करिश्माने ड्रग्ज चॅटची कबुली दिली आहे. मात्र ड्रग्ज संदर्भात ती फारच मोघम उत्तर देत आहे. शुक्रवारी रकुलप्रीतसमोरही करिश्माची चौकशी करण्यात आली. दीपिका व्हॉट्सअप ग्रुपची अॅडमिन होती? एनसीबी आज दीपिका पादुकोणची चौकशी करेल. दीपिकाची मॅनेजर करिश्मासोबतचे तिचे काही ड्रग्ज चॅट उघडकीस आले होते. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दीपिका करिश्माकडे माल मागत होती. यासोबतच करिश्मा आणि दीपिका ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बोलत होत्या त्या ग्रुपची अॅडमीन दीपिका होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3i4iA6i