Full Width(True/False)

बंदी घातलेल्या चायनीज अॅप्सची नव्याने भारतात एन्ट्री, कोट्यवधींनी केले डाउनलोड

नवी दिल्लीः भारताने एका पाठोपाठ तीन टप्प्यात अनेक चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. हे अॅप्स आता भारतीय युजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन नवीन पद्धत अवलंबत आहे. गेल्या काही महिन्यात इंडियन अॅप स्टोर्सवर नवीन चायनीज अॅप्सची वाढ आली आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, त्यात चिनी अॅप्सचे रिब्रँडेड व्हर्जन सुद्धा समावेश आहे. भारताने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतोय असे सांगून यावर बंदी घातली होती. भारताने आधी टिकटॉकसह ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलैमध्ये ४७ अॅप्स आणि सप्टेंबर मध्ये ११८ अॅप्सवर बंदी घातली होती. वाचाः रिपोर्ट्समध्ये काही अॅप्सची माहिती दिली आहे. नवीन रूप घेवून भारतात एन्ट्री घेतली आहे. प्रसिद्ध नावाचा व्हिडिओ अॅप च्या मालकीच्या kuaishou नावाच्या चीनी कंपनीने बनवला आहे. स्नॅक व्हिडिओ अॅपला गुगल प्ले स्टोरवर १० कोटी हून अधिक वेळा डाउनलोड केले आहे. तसेच या अॅपमध्ये युजर्संना प्रसिद्ध शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप टिकटॉक सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः भारताने Hago अॅपवर बंदी घातली आहे. अज्ञात लोकांसोबत चॅट रूम बनवण्यासाठी आणि गेम खेळण्याची सुविधा देत होता. आता या अॅपच्या जागी Ola Party नावाचा अॅप आला आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या माहितीनुसार, यात गेम खेळण्याची सुविधा मिळत नसली तरी परंतु, या अॅप्समध्ये Hago यूजर्स ची प्रोफाइल, फ्रेंड्स आणि चॅट रूम्स ला इंपोर्ट केले आहे. म्हणजेच हागो युजर्स थेट ओला पार्टीवर साइन इन करू शकते. वाचाः सरकार कोणते पाऊल उचलणार बंदी घातलेल्या लागोपाठी नवीन व्हर्जनमध्ये घेऊन जात असल्याचा इकॉनॉमिक टाइम्सने प्रश्न उपस्थित केला आहे. यावर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. हे नको व्हायला हवे. जर असे होत असेल तर आम्ही यावर कारवाई करू, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i5gmmX