मुंबई: मृत्यू () प्रकरणात समोर आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची दिशा संपूर्णपणे बदलली आहे. सीबीआय, ईडी आणि आता () सुद्धा या प्रकरणाचा तपास करत आहे. काही ड्रग पेडलरसह रिया चक्रवर्तीचा () भाऊ शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यालाही ताब्यात घेतलं आहे. आता या प्रकरणी हिचीही चौकशी होणार आहे. शौविक आणि सॅम्युअल यांना ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी संध्याकाळपर्यंत रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून समन्स बजावण्यात येणार असल्याचे समजते. आतापर्यंतच्या चौकशीत रियाचे काही चॅट्स उघडकीस आले होते. त्यावरून असे दिसून येते की रियाने बेकायदेशीररित्या ड्रग्ज खरेदी केले होते. ज्या प्रमाणे शौविकची चौकशी झालेली आहे, त्याच आधारे आता रियाचीही चौकशी केली जाणार असल्याचे कळते. एनसीबीकडे आता पुरावे म्हणून रियाचे चॅट्स आणि शौविकचा कबुली जबाब आहे. त्यामुळे रियाला या प्रकरणात अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शौविकने घेतले रियाचे नाव एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीत शौविक चक्रवर्ती याने रियाचे नाव घेतले आहे. तिच्या सांगण्यावरूनच ड्रग्ज खरेदी केले होते, असे त्याने सांगितले आहे. रिपोर्ट्सनुसार, रिया चक्रवर्ती कथितरित्या ड्रग्ज खरेदी करण्याव्यतिरिक्त त्याचा वापरही करत असल्याचे सांगण्यात येते. शौविक याने ड्रग्ज खरेदी करण्यासाठी रिया चक्रवर्तीचे क्रेडिट कार्ड वापरले होते, असे चौकशीतून समोर आले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2F4hb23