Full Width(True/False)

दीपिका-सारा-श्रद्धा तिघींसाठीही आहेत NCB चे वेगवेगळे प्रश्न

मुंबई- दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना आज (२६ सप्टेंबर) एनसीबीने चौकशीला हजर राहण्यासाठीचा समन्स बजावला आहे. ड्रग्ज चॅटमध्ये दीपिकाचं नाव समोर आलं होतं. या चॅटमध्ये दीपिकाने तिच्या मॅनेजर करिश्माकडे ड्रग्जची मागणी केली होती. बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन तपासण्यासाठी एनसीबी आज या अभिनेत्रींना वेवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू शकते. दीपिका पादुकोणला विचारले जाऊ शकतात पुढील प्रश्न - तू करिश्मा प्रकाशला केव्हापासून ओळखते आणि ती केव्हापासून तुझी मॅनेजर आहे? - २०१७ मध्ये कोको क्लबमध्ये पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीला कोणकोणते सेलिब्रिटी उपस्थित होते. (या पार्टीमध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्याचा संशय आहे.) - २०१७ च्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अमितचा उल्लेख आहे, हा अमित कोण? समोर आलेल्या चॅटमध्ये करिश्माने अमितला ड्रग्ज पाठवण्यास सांगितलं होतं. - नैराश्यानंतर दीपिका ड्रग्ज घ्यायची का? - बॉलिवूड पार्ट्यांनी ड्रग्ज घेणं सुरू केलं का? - तिला करिश्मा प्रकाशकडून ड्रग्ज मागवायची की कुठल्या पेडलरच्या संपर्कात आहे? - तिचे ड्रग्ज घेण्यासाठीचे इतर साथी कोण आहेत? सारा अली खानला विचारले जातील पुढील प्रश्न - सुशांतसिंह राजपूतची आणि साराची पहिली भेट कशी झाली? - तू रियाला कधी भेटलीस? - सुशांतसोबत ती किती दिवस रिलेशनशिपमध्ये होती? - तू कधी ड्रग्ज घेतलेस का? - तुला ड्रग्ज घेण्याची सवय आहे की कधीकधी घेतेस? - केदारनाथ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सुशांतसोबत तू ड्रग्ज घेतले होते का? - सुशांतनेही तुझ्यासोबत ड्रग्ज घेतले होते का? - तू ड्रग्जचा वापर केला का? - तू किती वेळा आणि कोणासोबत ड्रग्ज घेतले? श्रद्धा कपूरला विचारले जातील पुढील प्रश्न - २८ मार्च २०१९ रोजी सुशांतच्या गेस्ट हाऊसवर 'छिछोरे'ची सक्सेस पार्टी झाली होती? - त्या पार्टीत ड्रग्ज घेतले गेले होते का? - तूही ड्रग्ज घेतेस का? - तुला ड्रग्ज घेण्याची सवय आहे की कधीकधी घेतेस? - रियाने तुझ्याविरोधात विधान दिलं आहे, यावर तुझं काय म्हणणं आहे? - सुशांतसोबत तू किती वेळा ड्रग्ज घेतलेस? - जया साहाला तू कधीपासून ओळखतेस? - तू सीबीडी ऑइल घेतेस का? - सारा आणि रियासोबत ड्रग्ज घेतले का?


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/331FhDE