मुंबई: अभिनेता मृत्यू प्रकरणात नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोनेदेखील () विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. अभिनेत्री , तिचा भाऊ व तसेच अन्य संबंधितांशी संबंधित अमली पदार्थ प्रकरणाचा हे पथक तपास करणार आहे. या चौकशीदरम्यान रियानं मोठा खुलासा केला आहे. ईडी, सीबीआय चौकशीत कधीही ड्रग्ज न घेतल्याचं सांगितलेल्या रियानं ड्रग्ज घेतल्याचं एनसीबीच्या चौकशीत मान्य केलं आहे. इतकंच नाही तर याचं खापर तिनं सुशांतवर फोडलं आहे. मी केवळ सुशांतसाठी ड्रग्ज मागवत होते पण कधीही ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं रियानं सीबीआय चौकशीत सांगितलं होतं. पण आता एनसीबीच्या चौकशीत मात्र तिनं ड्रग्ज घेतल्याचं कबूल केलं आहे. ड्रग्ज घेतल्याचं मान्य केल्यानंतर सुशांतनंच तिला जबरदस्तीनं ड्रग्ज घेण्यासाठी भाग पाडलं होतं, असं रियानं म्हटलं, असल्याची माहिती आहे. सुशांतसिंह याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही भाऊ शौविक व सॅम्युएल मिरांडा यांच्या सहकार्याने सुशांतला अमली पदार्थ देत होती, असं सीबीआयच्या तपासात समोर आलं आहे. यामुळंच या तपासात एनसीबीनंही उडी घेतली आहे. एनसीबीनं आठवडाभरात कारवाई करून तीन मोठ्या अमली पदार्थ दलालांना अटक केली. हे दलाल शौविक व सॅम्युएलच्या संपर्कात होते, असे त्यांनीच सांगितलं. या सर्वांचा तपास करण्यासाठी एनसीबीनं एसआयटीची स्थापना केली आहे. या प्रकरणात सोमवारी एनसीबीनं रियाची पुन्हा सहा तास चौकशी केली. सायंकाळी तिला घरी सोडण्यात आले व मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी बोलवले आहे. तर सीबीआयकडून सुशांतसिंहच्या बहिणींची चौकशी सुरू आहे. दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात टोळीविरुद्ध जोमानं कारवाई सुरू झाली आहे. या अंमली पदार्थ टोळीची नस तंतोतंत ओळखणाऱ्या मराठी अधिकाऱ्याकडं या कारवाईचे नेतृत्व आहे. यांनी वर्षभरापासून कैलाश राजपूत टोळीचे पंख कापण्यास सुरुवात केली आहे.समीर वानखेडे हे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई क्षेत्रीय युनिटमधील सहसंचालक आहेत. रियाचा भाऊ शौविक व सुशांतसिंहचा व्यवस्थापक सॅम्युएलचा अंमली पदार्थांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीने मुंबईत विविध ठिकाणी छाप्याची कारवाई सुरू केली आहे. समीर वानखेडे यांनी डीआरआय अंतर्गत या अंमली पदार्थ टोळीवर चांगलाच अंकुश ठेवला आहे. त्यांना टोळीची पूर्ण माहिती असल्याने या कारवाईसाठी वानखेडे यांना खास डीआरआयमधून बोलविण्यात आले आहे. त्याअंतर्गतच धडाकेबाज कारवाई सध्या सुरू आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/335pfrq