Full Width(True/False)

Redmi Note 9 Pro चा आज फ्लॅश सेल, फोनची वैशिष्ट्ये पाहा

नवी दिल्लीः ला गेल्या आठवड्यात फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. परंतु या सेलमध्ये ज्यांना फोन खरेदी करता आला नाही. त्यांच्यासाठी आजचा सेल एक खास संधी आहे. रेडमीच्या या फोनचा आज अॅमेझॉन इंडिया आणि वर फ्लॅश सेल आयोजित करण्यात आला आहे. फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वाचाः Redmi Note 9 Pro ची किंमत आणि ऑफर्स रेडमी नोट ९ प्रोच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. फोनला ऑरोरा ब्लू, ग्लेशियर व्हाईट आणि इंटरस्टेलर कलरमध्ये खरेदी करता येवू शकते. वाचाः रेडमीच्या या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ६४ आणि १२८ जीबीचा पर्याय मिळतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. रेडमी नोट ९ प्रो अँड्रॉयड 10 बेस्ड MIUI 12 वर बेस्ड आहे. फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट करतो. यात फोनला पॉवर देण्यासाठी 5020mAh बॅटरी दिली आहे. 18 वाट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः कनेक्टिविटीसाठी वायफाय ब्लूटूथ, जीपीएस, ए जीपीएस यासारखे फीचर्स दिले आहेत. या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमद्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर, ८ मेगापिक्सलाच वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hi9Itd