Full Width(True/False)

५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत Tata Sky चे पाच बेस्ट DTH पॅक

नवी दिल्लीः कोणत्याही डीटीएचचे रिचार्ज करणे एक मोठे काम आहे. डीटीएचचे रिचार्ज करणे मोबाइलच्या रिचार्ज करण्यापेक्षा कठीण काम आहे. कारण, यात बऱ्याचदा पॅक कळत नाही. ग्राहकांना अडचण येवू नये यासाठी टाटा स्कायने खास पाच बेस्ट प्लान आणले आहेत. हे पाचही प्लान ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लान आहेत. वाचाः टाटा स्कायकडे पहिला पॅक हा Marathi Hindi Family Kids Sports HD आहे. या प्लानची किंमत ४७८.३० रुपये आहे. याची वैधता एका महिन्याची आहे. यात ग्राहकांना एचडी आणि एसडी दोन्ही प्रकारचे चॅनेल्स पाहायला मिळतील. ज्यात ४१ एचडी आणि ५० एसडी चॅनल्स आहेत. या पॅकमध्ये मराठी आणि हिंदीचे अनेक चॅनल्स पाहायला मिळतील. तसेच यात किड्स, न्यूज आणि म्यूझिक चॅनल्स आहेत. वाचाः दुसरा प्लानचे नाव Telugu Family Kids Sports HD आहे. याची किंमत ४४१.९६ रुपये आहे. या पॅकची वैधता एका महिन्याची आहे. हा प्लान मनोरंजन, स्पोर्ट्स, मूव्ही, किड्स आणि लाइफस्टाईल साठी परफेक्ट आहे. यात एकूण ३१ एचडी आणि ५० एसडी चॅनेल मिळतात. वाचाः तिसरा पॅक Kannada Family Kids Sports HD या नावाने आहे. याची किंमत ४०१.५१ रुपये आहे. याची वैधता सुद्धा एका महिन्याची आहे. या प्लानमध्ये जास्तीत जास्त कन्नड चॅनेल्स मिळतील. तसेच काही हिंदी चॅनेल्स सुद्धा आहेत. यात मूव्हीज, मनोरंजन, किड्स आणि स्पोर्ट्स चॅनलचा समावेश आहे. या प्लानमध्ये २८ एचडी आणि ४५ एसडी चॅनलचा समावेश आहे. वाचाः चौथा पॅक Telugu Malayalam Basic HD नावाने आहे. याची किंमत ३४३.४९ रुपये आहे. याची वैधता सुद्धा एका महिन्याची आहे. यात १९ एचडी आणि ४३ एसडी चॅनेल आहेत. यात जास्तीत जास्त तेलुगु आणि मल्याळम चॅनेल आहेत. वाचाः टाटा स्कायचा पाचवा व स्वस्त प्लानचे नाव Telugu Basic HD आहे. याची किंमत २०८.९८ रुपये आहे. यात तेलुगु सोबत हिंदी चॅनेल्स पाहायला मिळू शकतात. यात ११ एचडी आणि १५ एसडी चॅनेलचा समावेश आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32ljW86