Full Width(True/False)

शेअर मार्केट, हर्षद मेहता आणि 5 हजार कोटींचा घोटाळा

मुंबई- स्कॅम १९९२-द स्टोरी चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अगदी थोड्या वेळातच इण्टरनेटवर हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हंसल मेहता यांची ही वेब सीरिज ९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजची चर्चा होती. याचं एक मुख्य कारण म्हणजे यातील कथी ही सत्य घटनेवर आधारित आहे. एक असा घोटाळा ज्यामुळे ८०- ९० च्या दशकात संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. ५ हजार कोटींचा घोटाळा देशात करण्यात आला होता. आधी बादशहा मग घोटाळेबाज या वेब सीरिजमध्ये हर्षद शांतीलाल मेहताची गोष्ट सांगण्यात आली आहे. एक असा माणूस जो शून्यातून हिरो होतो आणि नंतर भारतातला सर्वात मोठा घोटाळा करणारा खलनायकही होतो. ही कथा ८०- ९० च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर तयार झाली आहे. हर्षद मेहता याला इतिहास घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या माणसाच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. त्याला वाटत असतं की शेअर बाजार ही एक खोल विहीर आहे जी संपूर्ण देशाच्या पैशाची तहान भागवू शकते. या विहिरीत उडी मारण्याच्या इच्छेसमोर तो कोणताही धोका पत्करायला तयार असतो. ४० रुपये घेऊन मुंबईला आला आणि बिग बुल झाला खिशात फक्त ४० रुपये घेऊन हर्षद बीएसईचा बच्चन कसा होतो हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. या सगळ्याच्या मागे असतं ते त्याचं तल्लख डोकं आणि ५ हजार कोटींचा घोटाळा. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्या पद्धतीने काम करतं त्यातीली त्रुटी ओळखून तो बीएसईचा बिग बुल बनला. वेब सीरिजची कथा 'द स्कॅम' या पुस्तकावर आधारित आहे देबाशीष बसू आणि सुचेता दलाल यांच्या 'द स्कॅम' या पुस्तकावर ही वेब सीरिज आधारित आहे. एका प्रसिद्ध स्टॉकब्रोकर घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीन कशी घसरली जाते हे यातून दाखवण्यात आलं आहे. या घोटाळ्याने शेअर बाजार आणि बँका यांच्या काम करण्याच्या पद्धतीत किती त्रुटी होत्या ते उघड केले. जबरदस्त संवांदांना प्रतीक गांधीच्या अभिनयाची जोड वेब सीरिजमधील संवादांचंही कौतुक केलं जात आहे. मैं हिस्ट्री बनाना चाहता हूं और हिस्ट्री ऐसे ही नहीं बनती। मेरा सबसे बड़ा क्राइम कि मैं हर्षद मेहता हूं। मैं सिगरेट नहीं पीता पर जेब में लाइटर रखता हूं, धमाका करने के लिए। यांसारखे संवाद सीरिजची उत्सुकता वाढवतात. वेब सीरिजमध्ये हर्षद मेहताची भूमिका प्रतिक गांधी या कलाकाराने वठवली आहे. कोण होता हर्षद मेहता हर्षद मेहता याचा जन्म २ जुलै १ ९५४ ला गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात झाला होता. त्याचं बालपण मुंबईच्या कांदिवली भागात गेलं. तिथे त्याच्या वडिलांचा एक छोटासा व्यवसाय होता. यानंतर हे कुटुंब रायपूरच्या माधोपुरा येथे गेलं. तिथेच उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तो कामाच्या शोधात पुन्हा मुंबईत आला. इथे बीकॉमचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने बर्‍याच नोकर्‍या केल्या. नंतर शेअर बाजारात उडी घेतल्यानंतर त्याचं आयुष्यच बदलून गेलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3n5Mdb3