Full Width(True/False)

मला पुन्हा मालिकेत घ्या; नेहा मेहताने निर्मात्यांकडे व्यक्त केली होती ईच्छा

मुंबई: 'तारक मेहता का उलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतली अंजली मेहता म्हणजे, अभिनेत्री नेहा मेहता पुन्हा एकदा मालिकेत येण्यास इच्छुक आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं मालिकेतून एक्झिट घेतली होती. तिचं असं अचानक मालिकेतून बाहेर पडणं चर्चेत होतं. त्यानंतर नेहानं मालिकेत पुन्हा यायची इच्छा निर्मिती संस्थेकडे व्यक्त केली होती. पण, तोवर अंजलीच्या या व्यक्तिरेखेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. नंतर ते आपला निर्णय बदलण्यास तयार नव्हते, असं नेहा म्हणते. मालिकेच्या सेटवर गटबाजी होत असल्याचं नेहानं अप्रत्यक्षरित्या सांगितलं होतं. पण, त्याबाबत विचारलं असता ती म्हणाली, की 'गटबाजीबद्दल मला काहीही बोलायचं नाही. कधी कधी शांत राहणं हेच पुरेसं असतं.' तिनं सेटवरील या विषयाला वाचा फोडल्यानं मालिकेविषयी नवीन चर्चा सुरू झाली आहे. नेहानं मालिकेतून काढता पाय घेतल्यानंतर निर्माते असित कुमार मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही नेहाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिलाच यापुढं या मालितेचा भाग होण्यात सर नव्हा. तसंच तिनं पुन्हा परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तिच्या जागी घेतेल्या नवीन अभिनेत्रीनं देखील चांगलं काम केलंय. त्यामुळं आता तिला काढणं अशक्य,असल्याचं ते म्हणाले. दरम्यान,'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेची सध्या चर्चा सुरू आहे. मालिकेनं ३००० भागांचा टप्पा पूर्ण केलाय. काही कलाकारांनी मालिकेतून काढता पाय घेतल्यानंतर त्यांच्या जागी नवीन कलाकारांची एन्ट्री होत आहे. नेहा मेहता यांनी गेल्या बारा वर्षांपासून अंजली भाभीची भूमिका साकारली होती. मात्र त्यांनी अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या जागी अभिनेत्री सुनैना फौजदार हिची निवड करण्यात आली आहे. आता अंजली भाभीच्या भूमिकेत सुनैना दिसत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3imhkLN