Full Width(True/False)

Bigg Boss १४ सलमानने दुप्पट केलं मानधन, रक्कम वाचून बसेल धक्का

मुंबई- अभिनेता बिग बॉसच्या सीझन १४ ही होस्ट करत आहे. आज ३ ऑक्टोबरपासून या रिअॅलिटी शोची सुरुवात होणार आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या रिअॅलिटी शोमध्ये दिवसागणिक वेगवेगळी वळणं येत असतात. प्रेक्षकांना शोशी खिळवून ठेवण्यात या शोला आतापर्यंत यश मिळालेलं आहे. करोनामुळे सलमान खान बिग बॉसच्या मानधनात कपात करेल असं सगळ्यांना वाटत होतं. पण सलमानच्या मानधनात कपात झाली नसून उलट दुप्पटीने त्याचं मानधन वाढलं आहे. सलमान खानचं मानधन ४५० कोटी रुपये झालं? मीडिया रिपोर्टनुसार सलमानने बिग बॉस १४ साठी ४५० कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं बोललं जात आहे. या संपूर्ण सीझनसाठी त्याने हे मानधन घेतलं आहे. यानुसार सलमान एका एपिसोडसाठी साधारपणे २० कोटी रुपये मानधन घेतो. स्वत: सलमान खानने याबद्दल काहीही सांगितलं नाही. पण एका ट्विटर अकाउंटवर यासंबंधीचे वृत्त देण्यात आले आहे. सलमानचं हे मानधन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या नसतील तर नवलच. यापूर्वी असं म्हटलं जात होतं की सलमानने आधीच्या सीझनमध्ये २५० कोटी रुपये मानधन घेतलं होतं. पण यावेळी मात्र त्याने आपलं मानधन दुप्पटीने वाढवलं. विशेष म्हणजे करोना काळात निर्मात्यांनीही त्याला हे मानधन देण्यास मंजूरी दिली. तसं पाहिलं गेलं तर बिग बॉसमध्ये सलमान खानची नेहमीच महत्वाची भूमिका राहिली आहे. एक होस्ट म्हणून तो प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात नेहमीच यशस्वी ठरला आहे. त्याच्यामुळे बिग बॉसचा टीआरपीही नेहमी चांगला असतो. दरम्यान, शनिवार आणि रविवारी त्याचा ग्रँड प्रीमिअर असेल. नेहमीप्रमाणे यंदाचा सीझनही सलमान खानच होस्ट करणार आहे. प्रत्येक सीझन हा आधीच्या सीझनपेक्षा जास्त रंजक असतो. हा सीझनही खूप सारं मनोरंजन करेल अशी अपेक्षा आहे. बिग बॉसचा हा सीझन करोनामध्येही देण्यात आलेल्या लक्झरी होममुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्या यापूर्वी कधीही देण्यात आल्या नव्हत्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cWJY4V