Full Width(True/False)

लोटपोट व्हायला भाग पाडेल मनोज बाजपेयी आणि दिलजीतचा कॉमक अंदाज

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मनोज बाजपेयी, आणि यांच्या आगामी '' सिनेमाची चर्चा होती. यंदा दिवाळीत प्रदर्शित होणार्‍या या सिनेमाच्या पोस्टरनंतर आता ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून लक्षात येतं की बहुतांशी गंभीर आणि इन्टेन्स भूमिका बजावणारे या सिनेमात आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. सिनेमाचा ट्रेलर ३ मिनिटे १६ सेकंदाचा आहे. 'सूरज पे मंगल भारती' सिनेमात १९९५ ची मुंबई दाखवण्यात आली आहे. सिनेमात दिलजित सूरजसिंग ढिल्लनची आणि मनोज बाजपेयी मधु मंगल राणेची भूमिका साकारत आहे. मंगल हा एक गुप्तहेर असतो जो लग्नाच्या आधी वराची हेरगिरी करण्याचं काम करतो. या हेरगिरीमध्ये मंगल एकदा सूरजचं लग्न मोडतो. यानंतर, सूरज सूड घेण्याच्या भावनेतून मंगलची बहीण फातिमा सना शेखला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो. या सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना ऋषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी यांच्या कॉमन मॅनच्या विनोदाची नक्कीच आठवण येईल. इथे पाहा ट्रेलर : या सिनेमात फातिमा सना शेख मनोज बाजपेयीची धाकटी बहीण दाखवली आहे. मनोज, फातिमा, दिलजीतसह अन्नू कपूर आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा सिनेमा दिवाळीच्या मुहुर्तावर १३ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3m7ukHn