Full Width(True/False)

सुशांत आणि रिया १३ जूनच्या रात्री भेटले होते; भाजप नेत्याचा दावा

मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता याच्या आत्महत्येला तीन महिने उलटून गेले आहेत. गेल्या तीन महिन्यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. सुशांतचे कुटुंबिय, त्याची गर्लफ्रेंड यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे खेळ रंगले. त्यातचं या या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आणि या प्रकरणाचा तपास एनसीबीकडूनही सुरू झाला. या तपासादरम्यान एनसीबीनं रियाला अटक केली. असं असलं तरी सुशांतचा मृत्यू नेमका कशामुळं झाला, या प्रश्नाचं उत्तर अद्यापही अनुत्तरीतच आहे. एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट सीबीआयकडे सोपवला असून हत्या झाल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं म्हटलं आहे. असं असताना या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण लागण्याची शक्यता असून १३ जूनच्या रात्री रिया आणि सुशांतला एकत्र पाहिल्याचा दावा एका प्रत्यक्षदर्शीनं केला आहे. देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून रिया सुशांतसोबत त्याच्या घरी राहत होती. परंतु ८ जून रोजी दोघांचं भांडण झालं आणि तिनं सुशांतचं घर सोडलं, असं तिनं चौकशी दरम्यान सांगितलं आहे. ८ जून नंतर पुन्हा सुशांतला कधीही भेटले नसल्याचं रियाचं म्हणणं आहे . परंतु भाजप नेता यांनी वेगळाच दावा केला आहे. रिया आणि सुशांत १३ जूनच्या रात्री एकमेकांना भेटले होते, असं त्यांनी म्हटलं आहे. विवेकानंद गुप्ता याच्या मते सुशांत आणि रिया १३ जूनच्या रात्री ३ वाजता एकत्र होते. सुशांतनं रियाला तिच्या घरी सोडलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी त्याची हत्या करण्यात आली. रियाला आणि सुशांतला १३ तारखेच्या रात्री एकत्र पाहिलं त्या त्या प्रत्यक्षदर्शीचं नाव सीबीआयला सांगण्याची त्यांची तयारी आहे. गेम चेंजर सुशांत आणि रियाच्या या कथीत भेटीवर सुशांतची बहिणी हिनं सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. या दाव्यामुळं खेळ पलटणार असल्याचं तिनं म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36nYSA0