मुंबई : यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर आधारित काही चित्रपट नुकतेच येऊन गेले. आगामी काळात असे आणखीही काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. छत्रपतींचे अत्यंत विश्वासू शिलेदार असलेल्या यांच्यावर आधारित एक चित्रपट तयार होत आहे. ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, नेमके कोणते कलाकार या चित्रपटात दिसणार, चित्रपट कोण दिग्दर्शित करणार याकडे सिनेप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे. स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शिवरायांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या नीडर मावळ्यांची. शत्रूच्या गोटात शिरुन तिथली खडा न् खडा खबर आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी बहिर्जींनी खुबीनं पार पाडली होती. पराक्रमी आणि महाराजांच्या खास मर्जीतील असलेल्या बहिर्जी यांच्या भूमिकेत कोणता अभिनेता असणार आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता असेल. लेखक यांनी या चित्रपटासाठी लेखनाची धुरा सांभाळली आहे. तसंच अभिनेते लिखित, दिग्दर्शित ' ' हा भव्य ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटात आणि यांच्या कारकीर्दीत स्वराज्याचे सेनापती म्हणून शौर्य गाजविलेल्या सेनापती यांच्या पराक्रमाची गाथा पाहायला मिळणार आहे. स्वतः तरडे यात ही भूमिका निभावत आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी वजनही वाढवलं आहे. ‘ऐतिहासिक व्यक्तिरेखा या तरुणांना प्रेरणा देणाऱ्या असतात, त्यामुळे त्या साकारताना कलाकारांनी तशी शरीरयष्टी घडवणंही गरजेचं आहे,’ असं तरडे सांगतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kvHC04