मुंबई- साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला दसरा हा हिंदूंच्या मुख्य सणांपैकी एक आहे. सत्याचा वाईटावर विजयाचा दिवस म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात मोठ्या भक्तीभावाने आणि थाटामाटात दसरा साजरा केला जातो. या खास प्रसंगी बॉलिवूड सेलेब्रेटीसुद्धा एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात आणि आपआपल्या घरी छोटेखानी पूजाही करतात. अभिनेता रितेश देशमुखनेही यानिमित्ताने आपल्या कुटुंबासोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो पत्नी आणि मुलांसोबत आरती करताना दिसत आहे. रितेश देशमुखने इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत रितेश आपल्या मुलांसोबत आरती करत आहे. तर जेनेलिया मुलांना प्रार्थना बोलताना न्याहाळत आहे. आतापर्यंत १ लाख १५ हजारांहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रितेशने सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा असा मेसेजही लिहिला. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सिनेमांमधून अनेकांची मनं सातत्याने जिंकत असतो. नुकताच तो द कपिल शर्मा शोमध्ये पत्नी जेनेलिया डिसोजा- देशमुखसोबत गेला होता. यावेळी दोघांनी लग्नाशी संबंधीत अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. रितेश आणि जेनेलिया अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला होता त्यात पती- पत्नीने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. त्यांच्या या निर्णयाचंही अनेकांनी कौतुक केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jxRRQ2