नवी दिल्लीः विवोकडून यावर्षी लाँच करण्यात आलेला बजेट स्मार्टफोन च्या किंमतीत कंपनीने मोठी कपात केली आहे. फेस्टिव सीजन आधी या स्मार्टफोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. नवीन किंमत १५ ऑक्टोबर पासून लागू करण्यात आली आहे. 91Mobiles च्या रिपोर्टमध्ये म्हटले की, ऑफलाइन रिटेलर्स मध्ये सुद्धा नवीन किंमतीत फोन खरेदी करता येवू शकणार आहे. वाचाः Vivo Y30 ची किंमत टेक ब्रँड विवोकडून जवळपास तीन महिन्याआधी लाँच करण्यात आलेल्या विवो वाय ३० ची किंमत आतापर्यंत १४ हजार ९९० रुपये होती. परंतु, आता या फोनला १३ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकणार आहे. फोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आल्यानंतर ही किंमत अॅमेझॉनवर दिसत आहे. परंतु, फ्लिपकार्टवर याच्या किंमतीत अद्याप बदल झालेला दिसत नाही. वाचाः स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.४७ इंचाचा आयपीएस एलसीडी पंच होल डिस्प्ले दिला आहे. फुल एचडी प्लस (1560x720 पिक्सल्स) रेजॉलूशन ऑफर करतो. हा फोन अँड्रॉयड 10 बेस्ड Funtouch OS 10 वर काम करतो. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजसोबत येणारा फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकतो. वाचाः विवोच्या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा असून १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी पंचहोल मध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. मीडियाटेक हीलियो पी३५ प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी मिळते. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GSj17e