Full Width(True/False)

अभिषेक बच्चनला विचारलं ड्रग्ज घेतो का? पाहा काय दिलं उत्तर

मुंबई- सोशल मीडियावर शांतपणे पण चपखल उत्तरं देणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. यावेळीही एका यूझरने त्याला भडकवण्याचा प्रयत्न केला. सध्या बॉलिवूडमधून अनेक ड्रग्ज कनेक्शनमध्ये असलेल्या सेलिब्रिटींची नावं पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत ट्विटरवरील एका यूझरने अभिषेकला ड्रग्जबाबतचा एक प्रश्न विचारला. त्या यूझरला अभिषेकने जे उत्तर दिलं तेच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यूझरने अभिषेकला विचारलं 'हॅश' घेतोस का? सोशल मीडियावर एका यूझरने अभिषेकला 'हॅश' घेताोस का? असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना अभिषेक म्हणाला की, 'माफ करा मी घेत नाही. पण तुमची मदत करण्यासाठी तुमची ओळख मी मुंबई पोलिसांशी नक्कीच करून देऊ शकतो. मला खात्री आहे की तुमची गरज जाणून घेतल्यानंतर त्यांनाही तुमची मदक करायला आनंदच होईल.' १५ ऑक्टोबरला थिएटर सुरू होण्याचा व्यक्त केला आनंद अभिषेक बच्चनने ट्विटरवर अनेक लोकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरू होण्याच्या निर्णयाचं स्वागत करणारं एक ट्वीट अभिषेकने केलं होतं. यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण नेहमीप्रमाणे अभिषेकने प्रत्येकाला शांतपणे जशात तसं उत्तर दिलं. 'मनमर्जियां'मध्ये दिसला होता अभिषेक बच्चन सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर अनुराग कश्यप दिग्दर्शित 'मनमर्जियां' सिनेमात अभिषेकने अखेरचं काम केलं होतं. यात त्याच्यासबत तापसी पन्नू आणि विक्की कौशल यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. लवकरच तो अनुराग बासूच्या ‘लुडो’ सिनेमातही दिसणार आहे. त्याच्यासोबत या सिनेमात आदित्य रॉय कपूर, राजकुमार राव, सान्या मल्होत्रा दिसतील.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33nUKxW