Full Width(True/False)

Samsung #GalaxyF41 #FullOn Festival साठी Samsung ने केली कलाकारांची घोषणा

आंतरराष्ट्रीय पातळीवरील संगीतकार त्यांच्या कॉन्सर्टचे व्हिडिओ सोशल मीडियावर लाइव्ह स्ट्रिमिंग करतात. भारतातही असंच भव्यदिव्य करण्याची वेळ आलीय. म्हणूनच Galaxy F - या लेटेस्ट स्मार्टफोन सिरीजच्या लाँचसाठी ने व्हर्च्युअल आयोजित केला आहे. या समारंभात मोठमोठे कलाकार परफॉर्म करणार आहेत. तुम्ही Galaxy F श्रेणीतील Galaxy F41 या पहिल्या स्मार्टफोनच्या भव्यदिव्य लाँचबद्दलच्या यापूर्वीच्या पोस्ट वाचल्या असतीलच. 6000mAh battery ची दमदार बॅटरी, डोळ्यांचे पारणे फेडणारा sAMOLED Infinity-U display आणि जबरदस्त 64MP Camera या वैशिष्ट्यांनी नटलेला Galaxy F41 मोबाइल आहे. हा फोन येत्या 8 ऑक्टोबर रोजी 5:30 PM या वेळेत एका शानदार ऑनलाइन कॉन्सर्टमध्ये #FullOn Festival मध्ये लाँच होणार आहे. प्रत्येकजण या दिमाखदार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे, या सोहळ्यात कोण सेलिब्रिटी असणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण ही प्रतीक्षा आता संपली आहे. जाणून घ्या कोण आहेत ते चार रॉकस्टार्स जे Samsung Galaxy F41 च्या लाँच सोहळ्यात तुमच्यावर त्यांच्या अदाकारीची #FullPower बरसात करणार आहेत. *Drumroll* अशी सेलिब्रिटी जी प्रेक्षकांना ऑनलाइन कॉन्सर्टमध्येही खिळवून ठेवेल, ती म्हणजे नेहा कक्कर! बॉलीवूड गायिका, प्रशिक्षित शास्त्रीय गायिका, रिअॅलिटी शोची परीक्षक - नीती मोहन ही हा #FullOn Festival आपल्या सादरीकरणाने खुलवणार आहे. या सोहळ्यात केवळ संगीत नसेल तर हास्याची मेजवानीही असेल. फ्लोर डान्सिंगने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर तुमच्या समोर राहुल दुआ तुम्हाला लाफ्टरच्या जगात घेऊन जाईल. भारताच्या हिप-हॉपच्या नकाशावर मुंबईचं स्थान निर्माण करणाऱ्या डिवाइनचा #FullOn परफॉर्मन्स या सोहळ्याला रंगत आणेल. मनोरंजन म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण! पण गेल्या काही महिन्यात आलेल्या बंधनांमुळे आपल्या आयुष्यातून मनोरंजन जणू वजा झाले आहे. या कंटाळवाण्या आयुष्यात हा दिमाखदार सोहळा तुम्हाला एकदम ताजं टवटवीत करून टाकणार आहे. #FullOn Festival मध्ये कलाकारांचे सादरीकरण या सोहळ्याची रंगत वाढवणार आहे आणि Galaxy F41 च्या लाँचला असं भव्यदिव्य सादरीकरण हवंच आहे, कारण हा फोन फक्त फोन नाही तो नव्या पिढीच्या जगण्याची एक पद्धत होणार आहे. ही पिढी, नवी पिढी ज्यांना आयुष्याकडून रसरसून हवं असतं आणि ते ते मिळवतातच. हा फोन यूजर्सना एक अनोखा अनुभव देणार आहे. आतापर्यंत कंपनीने केवळ तीन वैशिष्ट्यांची घोषणा केली आहे, तरी तरुणांची उत्सुकता ताणली आहे. Galaxy F41 एका फॅन्टॅस्टिक डिस्प्ले, दमदार बॅटरी आणि आकर्षक कॅमेरा सेटअपसह येणार आहे. सिनेमा, गेम्स, म्युझिक किंवा मनोरंजन काहीही असो तो अनुभव या फोनवर एकदम ‘full-on’ असणार आहे. आज बहुतांश भारतीय एकतर कामासाठी किंवा शिक्षणासाठी दिवसाचे किमान 6 तास स्मार्टफोनचा वापर करत आहेत, म्हणूनच एक हाय-परफॉर्मन्स स्मार्टफोन ही आवड नव्हे तर गरज बनली आहे. या फोनचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे या फोनने Flipkart आणि Samsung च्या ग्राहककेंद्री भागीदारीची सुरुवात केली आहे. या पार्टनरशीपमुळे २५० दशलक्ष भारतीयांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचणार आहे, तेही अशावेळी जेव्हा लोकांना या अशा तंत्रज्ञानाची अत्यंत गरज आहे. नव्या Galaxy F41 च्या वैशिष्ट्यांमुळे तुमचं आयुष्य तुम्हाला #FullOn मजेशीर कसं करता येईल तर तुम्ही घरबसल्या एक सुंदर ऑनलाइन कॉन्सर्टचा आनंद अनुभवण्यासाठी सज्ज व्हा आणि दिवस, वेळ राखून ठेवा. Facebook Live द्वारे किंवा Youtube, Twitter, App वर ला जॉइन व्हा आणि येथे टाइम्स ऑफ इंडियावर या #FullOn एक्साइटमेंटचे साक्षीदार व्हा. चा लाँच सोहळा 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे. हा सोहळा इंटरनेटवर सगळीकडे तुम्हाला पाहता येणार आहे, त्यामुळे हा #FullOn FOMO चुकवू नका. डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने प्रकाशित केली आहे.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3il4Kwl