मुंबई- '' मध्ये प्रत्येक खेळाडू घरात स्वत:चं स्थान पक्क करण्यासाठी वाट्टेल ते करण्याच्या तयारीत आहे. यामुळेच प्रत्येक दिवशी कोणा ना कोणा स्पर्धकाची भांडणं होताना दिसत आहेत. आणि जान कुमार सानू यांच्यात घराणेशाहीवरून वाद झाला. तर कविता कौशिक आणि एजाज खान यांच्यातल्या मैत्रीवर प्रश्न चिन्ह उपस्थित झालं. या शनिवार आणि रविवारी संपूर्ण आठवड्यात कोणी किती मोठी चूक केली याचा आढावा घेताना दिसणार आहे. राहुल वैद्य आज रात्री 'वीकेंड का वर'मध्ये सलमान खानच्या रागाचा पहिला बळी ठरणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये सलमान राहुलची शाळा घेताना दिसणार आहे. घराणेशाहीबद्दल वक्तव्य करणं आणि त्यावर चर्चा करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही असं सलमान म्हणाला. यासोबतच आपण काय बोलत आहोत याचा विचार करत जा असा सल्लाही त्याने यावेळी दिला. इतकच नव्हे तर एखाद्या वडिलाने आपल्या मुलाच्या अंगातले सुप्त गुण पाहून ते गुण अजून जोपासायला मदत केली तर त्याला घराणेशाही कसं म्हणता येईल असा प्रश्नही सलमानने यावेळी राहुलला केला. इतकंच नाही तर शोमध्ये नेहमीच फक्त रडताना दिसणारी जास्मीन भसीनवरही सलमान चिडला. राहुलने टास्कमध्ये तिच्यासोबत कोणतंही गैरवर्तन केलं नाही असं स्पष्टपणे म्हटलं. तसंच पूर्ण आठवड्या जास्मीन चुकीची वागली असंही म्हटलं. जास्मिनची जेव्हा सलमान शाळा घेतो तेव्हा राहुलचा आनंद गगनात मावेनासा होताना दिसतो. तो जोरजोरात टाळ्या वाजवतो. याशिवाय सलमानने राहुलविरोधात जास्मीनला भडकावल्याबद्दल रुबीनालाही चांगलंच फटकारलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2HHaDYD