मुंबई- '' मध्ये यावेळी भारतीय क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज 'द शो' मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करायला येत आहे. त्याच्यासोबत पत्नी प्रियांका रैना देखील आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा सुरेश आणि प्रियांका ही जोडी प्रेक्षकांना एकत्र पाहता येणार आहे. या शोच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये हे दोघंही आपल्या बाळाबद्दल आणि लॉकडाउन दरम्यानच्या अनुभवाबद्दल बोलताना दिसत आहेत. बाळाच्या प्लॅनिंगबद्दल बोलताना सुरेश म्हणतो की, ज्या दिवशी लॉकडाउनची घोषणा झाली त्याच दिवशी त्याचा जन्म झाला. आम्ही लॉकडाउनच्या आधीपासूनच प्लॅनिंग करत होतो. सुरेशच्या या बोलण्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. एवढंच नाही तर शोमध्ये कपिल शर्माने चाहत्यांना सांगितलं की रैनाचे प्रशिक्षक हे प्रियांकाचे वडिलच होते. तर तू मैदानात बॅटिंग करायचास की प्रियांकासाठी सेटिंग असा मिश्किल प्रश्न कपिलने सुरेशला विचारला. याचं उत्तर देताना सुरेश म्हणाला की, 'कोणताही बाप अशीच मुलगी मुलाच्या हातात देत नाही. प्रियांकासाठीही मला बरीच फिल्डिंग करावी लागली होती.' शोचा टीझर शेअर करताना सोनी टीव्हीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आता , कारण भारताचा सुपरस्टार क्रिकेटपटू सुरेश आणि पत्नी प्रियांका रैना दोघंही एकत्र आल्यावर आता हसण्यावर कोणतंही बंधन येणार नाहीत.' कपिल शर्मासोबच सुरेश रैनानेही आपल्या इन्स्टाग्रामवर या शोची झलक शेअर केली असून या लोकांनी हा एपिसोड बघण्याची उत्सुकता असल्याच्या अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3edoCRv