मुंबई- करोना व्हायरसमुळे देशभर सिनेमे बराच काळ बंद आहेत. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता पुन्हा थिएटर सुरू करण्याची तयारी झाली आहे. या काळात अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले तर अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. यातच असेही काही सिनेमे आहेत जे सुरुवातीला प्रदर्शित झाले होते मात्र करोना काळामुळे फारसे चालले नाहीत. असे काही सिनेमे पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिक पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. हा बायोपिक देशभरात पुन्हा प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्य भूमिकेत असलेला विवेक ओबेरॉयचा 'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा २४ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावर्षी देशात निवडणुका झाल्यामुळे त्याच्या रिलीजवर बरेच वादंग निर्माण झाले होते. यामुळे या सिनेमाने फारशी कमाई केली नव्हती. सिनेमाचे निर्माता सध्या वाराणसीत आहे. तो म्हणाला की, 'त्यावेळी सिनेमाशी संबंधित वादामुळे बॉक्स ऑफिसवरच्या कमाईत मोठा फरक पडला. आता थिएटर पुन्हा उघडणार आहेत, मला वाटलं ही योग्य संधी आहे. लोक संभ्रमात असल्यामुळे माझा सिनेमा ओटीटी किंवा टीव्हीवरही प्रदर्शित झाला नव्हता.' असं असलं तरी, चित्रपटगृह पुन्हा उघडल्यानंतरही किती लोक सिनेमा पाहण्यासाठी पोहोचतात यावर आत्ताच काही बोलता येणा नाही. याबद्दल संदीप सिंह म्हणाला की, किती लोक सिनेमा पाहण्यासाठी येतील हे निश्चित नसलं तरी आपल्याला पुढे जावं लागेल. करोनामुळे लोक घरातून बाहेर पडताना विचार करत असले तरी मॉल्स आणि रेस्तरां मोठ्या संख्येने उघडत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nEy04S