Full Width(True/False)

बिग बॉस करणार स्पर्धकांची 'अदला -बदली'

मुंबई: बिग बॉसच्या घरात येणाऱ्या नव्या दिवसात काही तरी ट्विस्ट येताना दिसताय. स्पर्धक जे स्वत:ला या खेळातील सर्वात मोठा मास्टरमाइंड समजत आहेत, त्यांचा गेम आता बिग बॉसनं पलटवला आहे. आजच्या भागात कविता कौशिक आणि ऐजाज खान यांच्या मैत्रीत काही तरी बिनचल्याचं पाहायला मिळणार आहे. तसंच रेड झोन आणि ग्रीन झोनमधील स्पर्धकांती अदलाबदली होणार आहे. नवीन प्रदर्शित करण्यात आलेल्या एका प्रोमोमध्ये निक्की तांबोळी ग्रीन झोन मध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. आता मी सर्वांना फिरवणार, असं ती याला म्हणताना दिसतेय. गुरुवारच्या म्हणजेच आजच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. स्पर्धकांना देण्यात आलेल्या टास्कमध्ये राडा झाल्याचंही या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. सध्या , , राहुल वैद्य आणि जान कुमार सानू हे स्पर्धक रेड झोनमध्ये आहेत. हे चारही स्पर्धक या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर होण्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत. तसंच आज कॅप्टन्सी टास्कचा निकाल देखील जाहिर करणार आहे. एजाज खान या आठड्यात कॅप्टन बनणार असल्याचं म्हटलं जात आहे. अदला-बदली टास्‍कमध्ये कविता कौश‍िक विरुद्ध निक्‍की तंबोली, राहुल वैद्य विरुद्ध जॅस्‍मिन भसीन अशा टीम असणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35HZ3nS