Full Width(True/False)

मराठी सिनेक्षेत्रात 'माल' म्हणजे...; केदार शिंदेंचं ट्विट चर्चेत

मुंबई: अभिनेता मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा वापर झाल्याचं समोर आल्यानं एनसीबीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याअंतर्गत एनसीबीच्या विशेष पथकाने सुशांतसिंहची मैत्रिण तसेच सिनेतारकांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एका मोठ्या कंपनीची अधिकारी जया शाह, यांच्या चौकशीत सिनेतारकांची नावे समोर आली होती. त्यावरून 'एनसीबी'ने अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर व राकूलप्रीत सिंह यांची चौकशी केली आहे. यानंतर किंग खान शाहरुखचं नाव समोर आल्यानं खळबळ माजली आहे. याच पार्श्नभूमिवर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक यांनी केलेलं एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर माल, हॅश , वीड हे शब्द चर्चेत आहेत. बॉलिवूडमध्ये सिगारेटला म्हटलं जात असल्याचं दीपिकानं सांगितल्यानंतर केदार शिंदेश यांनी मराठी सिनेसृष्टी 'माल' म्हणजे काय असतं हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. 'अभिमानाने सांगावं आणि स्वाभिमानाने मिरवावं असच काम हातून घडायला हवं. कारण मराठी मनोरंजन क्षेत्रात 'माल' नाही तर, रसिकांचं 'मोल' महत्वाचं ठरतं', असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, 'श्रीयुत गंगाधर टिपरे'सारखी अतिशय लोकप्रिय झालेली मालिका प्रेक्षकांसमोर आणणारा लेखक-दिग्दर्शक आता 'सुखी माणसाचा सदरा' घेऊन येतोय. म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर केदार ही नवी मालिका टीव्हीवर आणतोय. विशेष म्हणजे सुपरस्टार या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि श्रुजा प्रभुदेसाई या मालिकेमध्ये चमकणार आहेत. गेले काही दिवस केदार आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जुन्या गोष्टींचे फोटो अपलोड करून, त्या गोष्टी आपल्या सामान्यांच्या आठवणीत कशा राहिल्या आहेत याबद्दल लिहित होता. या पोस्टवरून लवकर तो काहीतरी नवीन घेऊन येत आहे याची चाहूल काही चाणाक्ष प्रेक्षकांना लागली होती. नवीन मालिका घेऊन येत असल्याचं कळल्यावर, ही मालिका कोणत्या विषयावर आहे? त्यात कलाकार कोण आहेत? ती कधीपासून सुरू होणार आहे? अशा अनेक प्रश्नांनी केदारचं सोशल मीडिया अकाऊंट भरलं होतं. या सगळ्या प्रश्नांना उत्तर म्हणून त्यानं त्याच्या नवीन मालिकेविषयी माध्यमांना सांगितलं आहे. 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेतून केदार पुन्हा एकदा टीव्ही क्षेत्रात पुनरागमन करत असून, येत्या दसऱ्याला मालिकेचा शुभारंभ होत असून कलर्स चॅनलवर होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30p1WrO