मुंबई : अमेरिकन रिअॅलिटी टीव्हीस्टार किम कर्दाशियननं अलीकडेच आपला चाळीसावा मोठ्या थाटात साजरा केला. वाढदिवसानिमित्त एका खासगी बेटावर एक मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. सध्या करोनाचा संसर्ग असताना साजऱ्या झालेल्या या ग्रँड पार्टीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. कर्दाशियननं इन्स्टाग्रामवर आपल्या पार्टीचे अनेक फोटो शेअर केले. यात मोठ्या संख्येनं लोक उपस्थित असल्याचं दिसून येतं. मास्क न वापरता लोक एकमेकांच्या जवळ असलेले दिसतात. तिनं पार्टीचे फोटो ट्विटदेखील केले होते. परंतु, यावरुन ती चांगलीच ट्रोल झाली आहे. नेटकऱ्यांचं म्हणणं आहे, की 'करोनाची दुसरी लाट आलेली असताना त्याची पर्वा न करता या दरम्यान पार्टी आयोजित केल्यानं हे दिसून येतं की, सेलिब्रिटी किती निष्काळजी आहेत. चाळीस वर्षीय किम ही जगप्रसिद्ध स्टार आहे. तिचं अनुकरण तिचे चाहते करत असतात. त्यामुळे सामाजिक जाणिव ठेवून सेलिब्रिटींनी वागलं पाहिजे.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35KnUrm