Full Width(True/False)

मैत्री असल्याचं सांगून एजाज खानने दिला राहुल वैद्यला दगा?

मुंबई- ‘बिग बॉस 14’ मध्ये गुरुवारनंतर आता शुक्रवारीही ‘अदला- बदल’ होणार आहे. या टास्क दरम्यान, रेड झोनमधील स्पर्धकांना ग्रीन झोनमध्ये जाण्याची एक संधी मिळणार आहे. रेड झोनमधील स्पर्धकांना ग्रीन झोनमध्ये पाठवत ग्रीन झोनमधील स्पर्धकांना रेड झोडमध्ये पाठवण्याचा निर्णय एजाजचाच असणार आहे. त्यामुळेच एजाजच्या निर्णयावर साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. टास्क दरम्यान एजाजच्या अडचणी वाढ होणार आहे. कारण आणि जास्मीन भसीन दोघंही एकमेकांवर गंभीर आरोप करणार आहेत. तर पवित्र पुनियाही रुबीना दिलैकवर हल्लाबोल करताना दिसणार आहे. 'बिग बॉस' च्या निर्मात्यांनी शुक्रवारचे दोन प्रोमो शेअर केले. यात राहुल आणि जास्मीन एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या टास्कमध्ये रेड झोनमधील स्पर्धकांना ग्रीन झोनमधील एखादा सदस्य निवडायचा आहे. तसेच ते ग्रीन झोनमध्ये राहण्यास का योग्य नाही हेही पटवून द्यायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही स्पर्धकांना एकमेकांविरोधात आपलं मत स्पष्ट करायचं आहे. यानंतर कॅप्टन एजाजला ज्याचं बोलणं पटेल त्याच्या पारड्यात मत टाकायचं आहे. टास्क दरम्यान एजाज आपलं मत मांडताना म्हणतो की त्याला राहुलपेक्षा जास्मीन जास्त चांगली स्पर्धक आहे. गुरुवारच्या भागातील निक्की तांबोळीने कविता कौशिकवर निशाणा साधत स्वतःची ग्रीन झोनमध्ये जागा पक्की केली होती. आता रेड झोनमधील उर्वरित तीन सदस्यदेखील शुक्रवारी आपली बाजू मांडताना दिसणार आहेत. जान कुमार सानू हा निशांत मलकानीला आव्हान देणार आहे. तर पवित्र पूनिया ही रुबीना दिलैकवर आरोप करणार आहे. आता एजाज काय निर्णय घेणार याचीच उत्सुकता आहे. कारण राहुल वैद्यने एजाजला कॅप्टन होण्यासाठी मदत केली होती. एजाजचं जास्मिनशीही याआधी बाचाबाची झाली होती. त्याचप्रमाणे जान आणि निशांत दोघंही एजाजसाठी खास आहेत. आता एजाज जुन्या मित्रांची साथ देणार की नव्या मित्रांना दिलेलं वचन पूर्ण करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37WvNN4