मुंबई: रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा बॉलिवूडमधील हॉट आणि क्यूट कपल्सपैकी एक आहेत.दोघं एकमेकांसोबतचे अनेक मजेशीर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्या शोमध्येही दोघांनी नुकतीच हजेरी लावली होती. या शोममध्ये यांनी त्याच्या आयुष्यातील मजेशीर तसंच काही खास गोष्टी शेअर केल्या. खरं तर दोघांचं भांडण झाल्याचं कधी ऐकण्यात आलं नाही. पण लग्नापूर्वी जेनेलियासोबत ब्रेकअप झाला असता, असा खुलासा रितेशनं कपिलच्या शोमध्ये केला. रितेश आणि जेनेलिया अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. डेट करत असतानाच रितेशनं जेनेलियासोबत ब्रेकअप करायचा निर्णय घेतला होता, असं रितेशनं कपिलच्या शोमध्ये म्हटलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काय आहे रितेश आणि जेनेलियाच्या ब्रेकअपचा किस्सा? डेट करत असताना रितेशनं एक गंमत म्हणून आपण हे नातं संपवूया, आपण ब्रेकअप करू; असा मेसेज जेनेलियाला केला होता. रितेशाचा हा मेसेज पाहून जेनेलियाला देखील धक्का बसला होता. तिला रितेश असं का म्हणतोय, काहीच कळत नव्हतं. त्यानंतर हा मेसेज गंमतीनं केल्याचं समजताच जेनेलियानं रितेशची चांगलीच शाळा घेतली होती. यापुढं अशी गंमत कधीही करणार नाही, असं वचन रितेशनं जेनेलियाला दिलं. रितेश आणि जेनेलियाची पहिली भेट २००२ मध्ये तुझे मेरी कसम सिनेमाच्या चित्रीकरणावेळी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांनी ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये मराठी आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34BaZs8