Full Width(True/False)

टीव्हीची ताकद ओळखली; दिग्गज कलाकारांचं दणक्यात कमबॅक

संकलन- शब्दुली कुलकर्णीसकारात्मक ऊर्जा गेली काही वर्षं नाटक एके नाटक करत होतो. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात केदारनं या मालिकेची संकल्पना सांगितली. वेगळी संकल्पना आणि केदारसह काम करण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे लगेच होकार दिला. शिवाय वेगळी भूमिका होती. एकाच भूमिकेच्या माध्यमातून एक जबाबदार मुलगा, पती आणि वडील दाखवता येत आहेत. शिवाय, पात्रातून प्रेक्षकांना सकारात्मक ऊर्जा देता येतेय याचा आनंद आहे. - मालिका म्हणजे रियाज मालिका या प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचतात. शिवाय, कलेचा रियाज करणं आवश्यक असतं. माझ्यासाठी मालिका करणं म्हणजे एक रियाज आहे. आता छोट्या पडद्यावर अनेक बदल झाले आहेत. ते बदल कमबॅकच्या निमित्तानं शिकता आले. आधी मालिकाविश्वात भावनांना प्राधान्य दिलं जायचं. आता पात्रांसह खेळतात. जे पात्र प्रेक्षकांच्या जास्त जवळ पोहोचतं, त्यावर भर दिला जातो. पात्र दमदार असलं की पुढचं सगळं गणित जमून येतं. - सुनिल बर्वे प्रतिमेला छेद माझ्या दृष्टीनं भूमिकेला खूप महत्त्व असतं. भूमिका उत्तम असली, की माध्यमाचा प्रश्नच उद्भवत नाही. इतकी वर्षं प्रेक्षकांच्या मनात माझी ग्लॅमरस प्रतिमा होती. त्याला छेद देणारी भूमिका मिळण्याच्या प्रतिक्षेत होते. ती या मालिकेच्या निमित्तानं मिळाली. हे सगळं कमबॅक करताना जुळून आलं म्हणून मालिका स्वीकारली. दरम्यानच्या काळात चित्रपट केले. पण, ते चालले नाहीत. कमी वेळेत जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असेल तर छोट्या पडद्याशिवाय पर्याय नाही. - पात्र लक्षात राहतं मालिका हे माझं पहिल्यापासून आवडतं माध्यम आहे. मालिकेतला प्रत्येक कलाकार सहजतेनं प्रेक्षकांच्या घरात पोहोचतो. मी २० वर्षं छोट्या पडद्यावर नानाविध भूमिका साकारतोय. त्यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. हीच छोट्या पडद्याची ताकद आहे. मालिकेचा विषय आवडला म्हणून छोट्याशा ब्रेकनंतर कमबॅक करण्याचा निर्णय घेतला. रोज उठून नवी दृश्यं करायला मिळतात, पात्राचे विविध कंगोरे आजमावून बघता येतात. हेच छोट्या पडद्याचं वैशिष्ट्य आहे. - सुबोध भावे पोहोच मोठी पुन्हा छोट्या पडद्याकडे वळायचंच नाही असं काही ठरवलं नव्हतं. पण, मनाला भावणारं काम मिळत नव्हतं. माझ्या करिअरची सुरुवात टीव्हीपासूनच झाली. या माध्यमानं छोट्या-छोट्या कलाकारांना मोठं केलं आहे. शिवाय, त्याची पोहोच मोठी आहे. त्यामुळे कमबॅक करण्याचा निर्णय घेतला. 'आज काय स्पेशल' हा कार्यक्रम निवडण्यामागचं कारण म्हणजे, लॉकडाउनच्या काळात अनेक जण पाककलेकडे वळले. मीसुद्धा नवनवीन प्रयोग केले. या कार्यक्रमामुळे आणखीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. - सोनाली खरे पुन्हा कनेक्ट होण्यासाठी...छोट्या पडद्याच्या प्रेक्षकांशी पुन्हा कनेक्ट होण्यासाठी मालिका स्वीकारली. मालिकेतलं माझं पात्र फार वेगळं आहे. दरम्यानच्या काळात नाटक आणि ओटीटीकडे वळले होते. तोच-तोचपणा जाणवू लागला की नवीन काही तरी करायचं हा माझा फंडा आहे. तसंच प्रत्येक माध्यमाची वेगळी गंमत आहे. जसं कलाकारानं वेगवेगळ्या छटा असलेल्या भूमिका करण्याकडे भर दिला पाहिजे, तसं माध्यम बदलणं आवश्यक असतं. - स्मिता तांबे


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31V70VF