Full Width(True/False)

अन् त्या दिवसानंतर सनी देओल आणि हेमा मालिनी यांच्यातला अबोला मिटला...

मुंबई: अभिनेता याचा आज वाढदिवस. सनी देओल सध्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत नसला तरी त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा होत असते.बॉलिवूडची ड्रीम गर्ल आणि पती ही जोडी नेहमीच सुपरहिट ठरली. परंतु, मीडियासमोर आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलणं दोघांनीही नेहमीच टाळलं. आणि धर्मेंद्र यांचं नातं कितीही घट्ट असलं तरी धर्मेंद्रची मुलं सनी, बॉबी आणि हेमा मालिनी यांच्यात सारं काही आलबेल नव्हतं, हेही तितकंच खरं. सनी आणि हेमा मालिनीच्या नात्यातील ही दरी कशी कमी झाली याची माहिती समोर आली . हेमा मालिनी यांचं ‘बियाँड द ड्रीम गर्ल’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यात सनी देओलशी असलेल्या नात्याचा उल्लेख हेमा मालिनी यांनी केला होता. त्यांच्यातील ही तेढ कमी करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला याबद्दलही त्यांनी आवर्जून लिहिलं आहे. अभिनेत्री डिंपल कपाडियामुळे हेमा मालिनी आपल्या सावत्र मुलाशी बोलायला लागल्याचा खुलासा पुस्तकात करण्यात आलाय. हेमा मालिनी यांनी १९९२ मध्ये ‘दिल आशना है’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती आणि त्यांची जवळची मैत्रीण मुख्य भूमिका साकारणार होते. चित्रीकरणादरम्यान हेमा मालिनी आणि सनी यांच्यातली दरी कमी होण्यास सुरुवात झाली. याबाबत हेमा मालिनी पुस्तकात म्हणाल्या की, ‘सिनेमात मिथुनसोबत मला पॅराग्लायडिंगचे एक दृश्य चित्रीत करायचे होतं. तसंच, सिनेमातील एका गाण्यामध्ये विमानाचं दृश्यही होतं. हे दृश्य घेण्याच्या काही दिवस आधी आमच्या वैमानिकाचा अपघात झाला. या घटनेमुळं डिंपल फारच घाबरली. डिंपलनं ही गोष्ट सनीला सांगितली. तेव्हा सनी माझ्याकडे विचारपूस करण्यासाठी आला आणि ती अगदी सुरक्षित राहील, असा विश्वास मी सनीला दिला.'या घटनेनंतर मी आणि सनीनं एकमेकांशी बोलायला सुरुवात केली, असंही हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं होतं. १९८३ साली ‘बेताब’ चित्रपटाने सुरू झालेला त्याचा प्रवास आता नव्या वाटेवर आला आहे. अॅक्शन हिरो म्हणून नाव काढणारा, दिलदार स्वभावाचा सनी देओल आता राजकीय रणांगणात उतरला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37hOnig