Full Width(True/False)

सौंदर्य असावं तर नुसरत जहांसारखं! बाइक लुकचे फोटो पाहिलेत का?

मुंबई- टीएमसीची खासदार (तृणमूल कॉंग्रेसचे खासदार) आणि अभिनेत्री तिचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ब्लॅक लेदरच्या ड्रेसमध्ये नुसरतने आपला मादक फोटे शेअर केला असून सोशल मीडियावर तिला अनेक प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांसह अभिनेत्री आणि खासदार मिमी चक्रवर्तीनेही या फोटोचं कौतुक केलं आहे. करोनानंतर आता चित्रपटगृह सुरू करण्यात आली आहेत. पुढील दोन महिन्यात अनेक नवीन सिनेमे प्रदर्शितही होतील. नुसरतचा SOS Kolkata हा सिनेमादेखील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हे फोटो नुसरतच्या याच सिनेमातील आहेत. सध्या नुसरतचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, यात ती फारच हॉट दिसत आहे. या फोटोंमध्ये ती ब्लॅक लेदरच्या आउटफिटमध्ये बाईकर लूकमध्ये दिसली आहे. बर्‍याच फोटोंमध्ये ती अभिनेता यश दासगुप्तसोबतही पोज देताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंचे सध्या भरभरून कौतुक केलं जात आहे. तिची मैत्रीण आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्तीनेही तिच्या लुकचं कौतुक करण्यापासून स्वत: ला रोखू शकली नाही. बंगाली सिनेमांच्या या दोन्ही अभिनेत्री त्यांच्या फॅशन स्टेटमेन्टमुळे बर्‍याचदा चर्चेत असतात. दरम्यान, नुसरतच्या या सिनेमात यश दासगुप्ता मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय सब्यसाची चक्रवर्तीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Hg7L4C