मुंबई टाइम्स टीम करोनाचं संकट अद्याप पूर्णपणे टळलेलं नाही. या प्रतिकूल परिस्थितीचा जबरदस्त आर्थिक फटका सिनेसृष्टीलाही बसला आहे. युरोप आणि अमेरिकेतील काही मोजके देश सोडले, तर सर्व ठिकाणची सिनेमागृहं सध्या बंदच आहेत. मात्र मोजक्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊनही याच्या '' या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पहिल्या तीन आठवड्यात 'टेनेट' या हॉलिवूडपटानं तब्बल ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी २०० दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले होते. शिवाय करोनामुळे चित्रपटाचं प्रदर्शन तीन वेळा पुढे ढकलण्यात आलं होतं. नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनसारख्या अनेक नामांकित ओटीटी प्लॅटफॉर्मनं या चित्रपटाला ऑनलाइन प्रदर्शित करण्याची ऑफर निर्मात्यांना दिली होती. परंतु, दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान त्यासाठी तयार नव्हता. 'वाट पाहेन, पण सिनेमागृहातच येईन' अशी जणू शपथच त्यानं घेतली होती. अखेर लॉकडाउन उघडताच शक्य तितक्या देशांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. अन् आश्चर्याची बाब म्हणजे प्रेक्षकांनीदेखील चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद दिला. करोनाकाळातही या चित्रपटानं तब्बल ३०० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. या निमित्तानं इतर सिनेनिर्मात्यांनाही त्यांचे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iOgMi5