मुंबई: स्टारकिड्स सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही होत होती. आता मात्र प्रेक्षकांचा लाडका खिलाडी यालाही नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागतोय. त्याच्याही सिनेमाला विरोध होऊ लागला आहे. कारण काय, तर त्याचा अलीकडे शेअर केलेला एक व्हिडीओ. होय, या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी आता अक्षयच्या '' या आगामी सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. हा हॅशटॅग सोशल मीडियावर चालवला जात आहे. आता या व्हिडीओ काय आहे; हे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगायचं झालं, तर अमली पदार्थांच्या सेवन प्रकरणी बॉलिवूडमधील मोठी नावं पुढे आली. या पार्श्वभूमीवर अक्षयनं एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून अक्षय पहिल्यांदा बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर बोलला होता. पण, हीच प्रतिक्रिया अक्कीला महागात पडली आहे. 'बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांचं सेवन केलं जात नाही, असा दावा मी करणार नाही. ती गोष्ट आहे. पण, म्हणून सगळेच यात सामील असतील, असा याचा अर्थ नाही', असं अक्षय या व्हिडीओत म्हणाला होता. त्याच्या या व्हिडीओला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला होता. यात करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, अंगद बेदी अशा अनेकांचा समावेश होता. नेटकऱ्यांनी मात्र याच व्हिडीओवरून अक्कीच्या सिनेमाला विरोध करत त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2GEbKqZ