नवी दिल्लीः रियलमीने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनला दोन व्हेरियंटमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी आणि ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. याच्या ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. तर १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरी यासारखे फीचर्स दिले आहेत. तसेच कंपनीने बड्स एयर प्रो, बडस वायरलेस प्रो आणि 20,000mAh पॉवर बँक २ ला लाँच केले आहे. वाचाः फोनची वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 720x1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत येतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 SoC प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरसोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, एक दोन मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः रियलमी बड्स एयर प्रो हे खास डिव्हाईससोबत येते. यात दोन मायक्रोफोन दिले आहेत. हे बड्स 35dB पर्यंत वॉइस कँसलेशन ऑफर करते. यात खास ट्रान्सपॅरन्सी दिला आहे. यात दमदार साउंडसाठी 10mm बेस बूस्टर और बूस्ट+ मोड दिले आहे. कनेक्टिवटीसाठी यात ब्लूटूथ 5.0 मिळतो. इयरबड्स IPX4 रेटिंग सोबत येते. रियलमी बड्स एयर प्रोची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः रियलमी बड्स वायरलेस प्रो हे दोन रंगात येते. यात एसवन चिपचा वापर करण्यात आला आहे. यात 35dB पर्यंत नॉइज कँसलेशन देते. यात ट्रान्सपॅरन्सी मोड सोबत एचडी मायक्रोफोन दिले आहेत. दमदार साउंटसाठी 13.6mm डायनामिक बेस बूस्टर दिले आहेत. यात 160mAh बॅटरी दिली आहे. ही २२ तासांपर्यंत बॅकअप देते. याची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः रियलमी पॉवर बँक 2 20000mAh रियलमीचा हा पॉवरबँकमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. यात चार्जिंगसाठी तीन पोर्ट दिले आहेत. हे १८ वॉट फास्ट चार्जिंग ऑफर करीत आहे. या पॉवर बँकची किंमत १ हजार ५९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iBwih5