मुंबई: अभिनेत्री पायल घोषनं काही कारण नसताना माझं नाव घेऊन बिनबुडाचे व अश्लील आरोप करून माझी बदनामी केली आहे', असं म्हणत अभिनेत्री हिनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायालयात आज सुनावणी करण्यात आली. यानंतर अभिनेत्री हिनं तिची माफी मागण्याची तयारी दर्शवली आहे. 'अभिनेत्री रिचा चढ्ढा हिच्यासंदर्भात केलेलं विधान मागे घेऊन माफी मागण्याची माझी तयारी आहे..’असं अभिनेत्री पायल घोषनं अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात म्हणणं मांडले आहे. त्यामुळं हा वाद संपण्याची शक्यता आहे. 'अभिनेत्री रिचा चढ्ढाविषयी मला खूप आदर आहे. अनुराग कश्यप प्रकरणात मी वाईट हेतूनं तिच्या नावाचा उल्लेख केला नाही’, अभिनेत्री पायल घोष हिनं वकिल अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात निवेदन दिलं होतं. 'पायल घोष आपलं ते विधान मागं घेण्यास तयार असेल आणि माफी मागण्यास तयार असेल तर रिचासोबतचा वाद मिटू शकतो’, असं न्यायमूर्ती ए. के. मेनन यांनी सुचवलं होतं. त्यानंतर पायलनं रिचाची माफी मागण्याची तयारी दाखवली आहे. तसंच अनुराग कश्यप प्रकरणात रिचा चढ्ढाची अमोदा ब्रॉडकास्टिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड किंवा कोणत्याही अज्ञात व्यक्तीनं यापुढे आणखी बदनामी करू नये. असे आदेशही मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. काय आहे प्रकरण?'अनुरागने २०१४मध्ये मला त्याच्या घरी बोलावून माझा विनयभंग केला आणि माझ्यासमोर अश्लील वर्तन केलं', असा आरोप पायलनं जाहीररीत्या केल्यानंतर त्याविषयी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यासंदर्भात एका व्हिडिओद्वारे आरोप करताना पायलने रिचाचाही उल्लेख केला होता. त्यामुळं रिचानं अॅड. सवीना बेदी यांच्यामार्फत अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून त्यात पायल आणि पायलचा व्हिडिओ प्रसारित करणारे एबीएन तेलुगू ही युट्युब वाहिनी तसेच अभिनेता कमाल आर. खान यांना प्रतिवादी केले आहे. या सर्व संबंधितांना आक्षेपार्ह मजकूर पसरवण्यास आणि तो प्रसारित करण्यापासून तातडीने मज्जाव करावा, अशी विनंतीही रिचाने दाव्यासोबतच्या तातडीच्या अर्जात केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Gs1Glk