मुंबई- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या आमिर खानने 'कयामत से कयामत तक', 'दिल', '३ इडियट्स', 'तारे जमीन पर' आणि 'दंगल' अशा बर्‍याच सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. आमिरचा सिनेमा म्हटलं की चाहत्यांना वेगळं काही पाहायला मिळणार याची हमखास खात्री प्रेक्षकांना पटली आहे. ऑन-स्क्रिनप्रमाणेच त्याचे चाहते आमिरच्या ऑफ- स्क्रिन कामांमधूनही सतत प्रेरणा घेत असतात. बेनेट विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ २०२० मध्ये प्रमुख पाहुणा म्हणून गेला होता. या दरम्यान त्याने विद्यार्थ्यांसोबत बर्‍याच गोष्टी शेअर केल्या. बेनेट विद्यापीठ दीक्षांत समारंभ बेनेट विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या वेळी विद्यार्थ्यांना फक्त आमिर खान ऐकायला मिळाला नाही तर त्याने दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दलही बरीच माहिती दिली. '३ इडियट्स'मधील आमिर खानची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे राजकुमार हिरानी यांच्या '३ इडियट्स' सिनेमात आमिरने वयाच्या ४४ व्या वर्षी एका विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती. जेव्हा निर्मात्यांनी या सिनेमाबद्दल आमिरला विचारलं तेव्हा विद्यार्थ्याची भूमिका मी कशी करेने याचाच विचार डोक्यात आला. आमिर खान पुढे म्हणाले की, 'यशाच्या मागे धावू नका, क्षमतेचा पाठलाग करा' या सिनेमाच्या मूळ कल्पनेने तो प्रभावित झाला होतो. त्याचवेळी राजकुमार हिरानी यांनाही या भूमिकेला आमिरच न्याय देऊ शकेल याची खात्री होती. आमिर खानचा आगामी सिनेमा आमिर खानच्या सिनेमाबद्दल बोलायचे तर, लवकरच तो ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करोना विषाणूमुळे या सिनेमाचं चित्रीकरण थांबलं होतं. पण आता पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सध्या दिल्लीत सिनेमाचं चित्रीकरण होत आहे. या सिनेमात करिना कपूरचीही मुख्य भूमिका असणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपती 'लाल सिंग चड्ढा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2SlpIkd