Full Width(True/False)

बॉलिवुड ड्रग नेक्ससचा 'मास्टरमाइंड' आहे एक अभिनेता आधी होता मॉडेल

मुंबई- बॉलिवूड ड्रग चॅटचा मुद्दा सध्या बराच चर्चेत आहे. नारकोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, सिमॉन खंबाटा आणि रकुलप्रीत सिंग यांची चौकशी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कथित बॉलिवूड ड्रग्ज नेक्ससमागील 'मास्टरमाइंड' हा एक अभिनेता असून तो यापूर्वी सुपर मॉडलही होता. येत्या काही दिवसांत एनसीबीला समन्स पाठवू शकते एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आणखी तीन कलाकारांची चौकशी सुरू करण्यात येईल. यातील एक कलाकार हा अभिनेता असून तो कथित 'मास्टरमाइंड' असल्याचं बोललं जात आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तो एक सुपर मॉडेलही होता. एनसीबी येत्या काही दिवसांत या तिघांना चौकशीसाठी समन्स बजावणार असल्याचं म्हटलं जात आहे. सिनेउद्योगातील अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांच्या सध्या एनसीबी मुसक्या दाबत आहे. या प्रकरणातील कथित 'मास्टरमाइंड' हा या प्रकरणातील मोठा खिलाडी असल्याचंही बोललं जात आहे. त्याचा ड्रग्ज पेडलर्सशी थेट संबंध असून सिनेसृष्टीत अमली पदार्थांची देवाण- घेवाण तोच करतो असंही म्हटलं जात आहे. असं असलं तरी याबद्दल एनसीबीने अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. रियाचे वकील म्हणाले रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं की, अभिनेत्रीने चौकशीदरम्यान कोणत्याही अभिनेत्याचं नाव घेतलं नाही. ते म्हणाले, रियाने आपल्या जबाबात कोणाचंही नाव घेतलं नाही. एनसीबी किंवा कोणी असं म्हणत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. रियाने सुशांतसिंह राजपूत सोडून इतर कोणाचंही नाव घेतलं नाही. एनसीबीने २० जणांना केली अटक सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीनही यंत्रणा काम करत आहेत. ईडीच्या चौकशीत ड्रग्ज प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर एनसीबीने या प्रकरणात उडी घेतली. या तपासात बरीच नावं समोर आली असून आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3l7yCOq