मुंबई: लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक याची वर्सोवा पोलिसांनी काल तब्बल आठ तास चौकशी केली. अभिनेत्री हिच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अनुराग यांना बजावण्यात आले होते. अनुराग कश्यप गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास वकिलासह वर्सोवा पोलिस ठाण्यात हजर झाला होता. चौकशी दरम्यान पोलिसांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत अनुराग यांचा जबाबही नोंदवून घेतला. चौकशी दरम्यान अनुराग यांनी पायल हिनं केलेले सर्व आरोप फेटाळून लावल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितल. पायलला वर्सोवा येथील घरी बोलावलं नाही. व्यावसायिकदृष्ट्या संबंध येत असल्यानं पायलशी परिचय आहे. मात्र बऱ्याच दिवसांपासून तिला कधी भेटलो नाही, तसंच फोनही केला नाही, असंही अनुरागनं जबाबात नमूद केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसंच आरोप करताना पायलनं ज्या घटनेचा उल्लेख केला आहे, त्या दरम्यान अनुराग भारतात नव्हताच, असा दावा अनुरागच्या वकिलांनी केला आहे. २०१३ मध्ये पायलनं अनुरागनं तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. पण त्या दरम्यान अनुराग एका कामासाठी महिनाभर श्रीलंकेत होता. यासंदर्भातील कागदपत्रे देखील पुरावे म्हणून उपलब्ध असल्याचं अनुरागच्या वकिलांनी म्हटलं आहे. सुमारे आठ तास कसून चौकशी केल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास अनुराग पोलिस ठाण्यातून बाहेर पडला. गरज पडल्यास पुन्हा चौकशी केली जाईल आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. पायल घोष हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आणि अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला. तिची आणि अनुराग याची मैत्री फेसबुकवर झाल्याचं तिनं सांगितलं. त्यानंतर ती अनुराग याला भेटली. तिसऱ्या भेटीत अनुरागने तिला घरी बोलावलं आणि यावेळी त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असे तिनं म्हटलं होतं. यानंतर तिनं केलेल्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी अनुराग विरोधात बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम ३७६, ३५४, ३४१ आणि ३४२ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34fjGap