मुंबई- 'बिग बॉस १४' च्या प्रीमिअरला आता काही तासच उरले आहेत. अगदी थोड्या तासांमध्ये च्या सीझनमध्ये कोणत्या सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे ते कळले. सेलिब्रिटींची तोंडओळख करणाऱ्या एपिसोडची सध्या शूटिंग सुरू आहे. या शोच्या प्रिमीअरला सलमान खानचा लुक कसा असेल याची त्याने नुकतीच एक झलक दाखवली आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार या रिअॅलिटी शोचा ११ वा सीझन होस्ट करत आहे. फक्त तीन सीझन त्याने हा शो होस्ट केला नव्हता. अन्यथा बिग बॉस आणि सलमान खान हे एक समिकरणच झालं आहे. नुकताच सलमानने सेटचे काही फोटो आणि त्याचा लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली असेल यात काही शंका नाही. बिग बॉस आणि सलमानचे कट्टर चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत सलमान खान 'बिग बॉस १४' च्या लोगो कव्हरच्या पुढे उभा राहिलेला दिसत आहे. त्याने यावेळी काळी पॅन्ट, काळा शर्ट आणि काळ्या कोटला प्राधान्य दिलेलं दिसतं. यासोबतच त्याने मास्कही काळ्या रंगाचंच घातलं आहे. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, विकेण्डला मी तुम्हा सर्वांच्या भेटीला येत आहे. 'बिग बॉस १४' चा प्रीमिअर उद्या शनिवार ३ ऑक्टोबर रोजी रात्री सुरू होत आहे. शोच्या ग्रँड प्रीमिअर दरम्यान सलमान सर्व सेलिब्रिटी स्पर्धकांची ओळख करून देईल. रिपोर्ट्सनुसार, या सीझनमध्ये राधे मां, श्रीशांत, तहसीन पूनावाला, तनिषा मुखर्जी, श्वेता तिवारी, रिमी सेन, पामेला अँडरसन, नवज्योत सिंग सिद्धू, खली, करिश्मा तन्ना, रश्मी देसाई, करण मेहरा यांच्याशिवाय सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान असे आजी आणि माजी स्पर्धकही दिसू शकतात.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34hdTRJ