मुंबई- टाइम्स म्युझिकने यांच्या आवाजातील दुर्गा सप्तशतीच्या अत्यंत शक्तिशाली श्लोकांचा संग्रह 'दुर्गा सप्तशलोकी' सादर केला. अंजली दयाल यांनी संगीतबद्ध केलेले हे भक्तीगीत यंदा नवरात्रीत भाविकांसाठी खास शेअर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हेमा मालिनी यांच्या ७३ व्या वाढदिवसाला हा संग्रह रिलीज करण्यात आला. हा ट्रॅक महिलांनी दिग्दर्शित केलं असून गायलंही महिलांनीच आहे. टाइम्स म्युझिकच्या नवरात्रोत्सवाचा भाग म्हणून याचा एक व्हिडिओ प्रथमच समोर आला आहे. हेमा मालिनी यांच्या 'जय अंबे गौरी आणि दुर्गा नामवली' हे गाणं गायलं आहे. तर गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या 'दुर्गा कवच' यांचा व्हिडिओही या उपक्रमाचा एक भाग म्हणून रिलीज करण्यात आला आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, मी संस्कृत शिकली आहे आणि घरी दुर्गा सप्तशती वाचली आहे. आणि संगीतकार अंजली दयाल, तसंच व्हिडिओ दिग्दर्शक अनुराधा निषाद यांच्या ऑल-वुमन टीमसोबत दुर्गा सप्तशलोकी, दुर्गा नामवली हे गाण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. माझ्या वाढदिवसाला हे गाणं रिलीज करणं हा माझ्यासाठीचा एक आशीर्वादच आहे. दुर्गा सप्तश्लोकी हे टाइम्स म्युझिकचं एक्सक्लूसिव रिलीज असून टाइम्स म्यूजिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर हे गाणं ऐकायला आणि पाहायला मिळेल.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/344mckK