मुंबई टाइम्स टीम मार्च महिन्यापासून करोनाचं दुष्टचक्र सुरू झाल्यावर मनोरंजनविश्वही ठप्प झालं. त्यानंतर मात्र 'थांबायचं नाही' म्हणत सगळीच क्षेत्रं अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करू लागली. मनोरंजन क्षेत्रही त्यात मागे नाही. एरवी कधीही न थांबणारं टीव्ही हे माध्यमही तीन महिने बंद होतं. एरवी काहीही झालं तरी मालिका सुरू ठेवण्याचा आटापिटा केला जातो. पण, यावेळी ते शक्य झालं नाही. तीन महिने मालिकांच्या नव्या भागांचं प्रक्षेपण झालं नाही. म्हणूनच, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्व वाहिन्यांनी कंबर कसली आहे. पूर्णपणे कात टाकत टीव्ही माध्यमावर नव्याची नवलाई दिसून येतेय. अनेक नव्या मालिका सुरू झाल्या आहेत, तर काही लवकरच येत आहेत. सतत काहीतरी नवीन देणं ही टीव्ही माध्यमाची गरज असते. वाहिन्यांची संख्या वाढल्यामुळे आता स्पर्धाही वाढली आहे. लॉकडाउननंतर प्रेक्षकांना पुन्हा टीव्हीकडे वळवणं हे आव्हानात्मक होतं. तीन महिन्यांपूर्वी मालिका नेमकी कोणत्या वळणावर होती याची उजळणी म्हणून नव्या भागांमध्ये काही संदर्भ घातले गेले. काही रंजक वळणंही आणली. पण, एवढंच पुरेसं नव्हतं. आता मनोरंजनाची नवी इनिंग आणणं ही गरज होती. म्हणूनच नव्या मालिकांची रांग लागली. वैविध्यपूर्ण विषयांसह कलाकार, निर्माते, कथा अशा सर्व बाजूंनी टीव्ही माध्यम कात टाकतंय. या सगळ्यात प्रेक्षकांना नव्या मनोरंजनाची मेजवानी मिळाली आहे. ० नव्या-जुन्याचा मेळ सध्या सगळ्याच वाहिन्यांवर नव्याची नवलाई दिसून येतेय. या नवलाईत मालिकांमधून लोकप्रिय झालेले काही तरुण चेहरे आहेत. काही मालिकांमधून जुने लोकप्रिय कलाकारही दिसताहेत. , , मंदार जाधव, विशाल निकम, हर्षद अतकरी अशा मालिकांमधून ओळख मिळालेल्या चेहऱ्यांना वाहिन्यांनी पसंती दिली. तर दुसरीकडे गिरीजा प्रभू, अक्षया नाईक या नव्या चेहऱ्यांना पुढे आणलं. टीआरपीची गणितं, प्रेक्षकांचा प्रतिसाद या सगळ्याचा विचार करत वाहिन्यांनी नव्या-जुन्याचा समतोल चांगलाच सांभाळला आहे. टीव्हीवर पुनरागमन सिनेमा, नाटकांमध्ये प्रस्थापित झालेले काही कलाकार पुन्हा टीव्ही माध्यमाकडे वळले. या कलाकारांनी मालिकांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. 'अनुबंध' मालिकेत नायिकेच्या मैत्रिणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री स्मिता तांबेनं 'लाडाची मी लेक गं' या मालिकेतून धमाकेदार एंट्री घेतली आहे. 'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेनंतर अभिनेत्री वर्षा उसगावकर दहा वर्षांनी 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधून मराठी मालिकाविश्वात पदार्पण करताहेत. अभिनेता आणि मालिकांचं अतूट नातं आहे. 'तुला पाहते रे'च्या यशानंतर सुबोध 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेतून दिसणार आहे. एव्हरग्रीन अभिनेता सुनील बर्वे सध्या 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतून पुन्हा एकदा घराघरात पोहोचलाय. 'ग्रहण'नंतर सुनील 'सहकुटुंब...'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. तर 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही कौटुंबिक मालिका देणारा दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा मालिकेचं दिग्दर्शन करणार आहे. 'सुखी माणसाचा सदरा' ही त्याची नवीकोरी मालिका लवकरच सुरू होणार आहे. भरत जाधवही यानिमित्तानं बऱ्याच वर्षांनी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ० कुछ हट केवेगळेपण फक्त मालिकांमध्येच का हवं? असं म्हणत रिअॅलिटी शोही सुरू झालेत. सध्या 'सिंगिंग स्टार' आणि 'डान्सिंग क्वीन' हे दोन कार्यक्रम वेगळी संकल्पना घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करताहेत. उत्तम गाणाऱ्या कलाकारांची स्पर्धा सिंगिग स्टारमधून बघायला मिळतेय. तर वजनदार मुलींचं नृत्यकौशल्य 'डान्सिंग क्वीन'मधून दिसतंय. दोन्ही संकल्पना हट के असल्यामुळे प्रेक्षकांनीही त्या स्वीकारल्याचं दिसून येतंय. ० कलाकार झाले निर्मातेकलाकारानं कोणत्याही माध्यमात काम केलं, तरी त्यातल्या विविध विभागांची, कार्यपद्धतींची त्याला माहिती असते. यापूर्वी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलेले काही कलाकार पुन्हा एकदा नव्यानं निर्मात्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेची निर्माती आहे. तर 'शुभमंगल ऑनलाइन' या मालिकेचा निर्माता सुबोध भावे आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे निर्माता म्हणून मालिकाविश्वात प्रस्थापित झालाच आहे. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या नव्या मालिकेच्या निमित्तानं तो पुन्हा एकदा निर्मात्याच्या भूमिकेत दिसतोय. तेजपाल वाघनं आजवर अभिनय आणि लेखनाची धुरा सांभाळली आहे. आता तो निर्माता म्हणून 'कारभारी लय भारी' ही नवी मालिका घेऊन येतोय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33ueDnc