Full Width(True/False)

सुशांतला आत्महत्येसाठी कोणी भाग पाडलं? 'एम्स'च्या अहवालानंतर कंगनाची आगपाखड

मुंबई: मृत्यू प्रकरणी ''चा अहवाल आल्यानंतर हिने पुन्हा एकदा आगपाखड करायला सुरुवात केली आहे. एखाद्याला आत्महत्या करायला भाग पाडणे म्हणजे त्याची हत्या करण्यासारखेच असल्याचे म्हणत सुशांतला हे पाऊल उचलायला कुणी लावले? असा सवालदेखील तिनं विचारला आहे. सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्याच केल्याचं या अहवालात 'एम्स'ने स्पष्ट केलं आहे. परंतु, कंगनाने या अहवालावर ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपट सृष्टीतून सुशांतला हद्दपार करण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांपासून ते त्याच्या कुटुंबाला वाटणाऱ्या काळजीपर्यंत अनेक मुद्द्यांचा उल्लेख कंगनाने केला आहे. सुशांतविरोधात कट... 'यशराज फिल्म्ससोबत झालेल्या वादाबाबत सुशांत उघडपणे बोलला होता. त्यानंतर अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने त्याच्यासोबत काम करण्यावर बंदी घातल्याचे सत्य सर्वांना माहीत आहेच. त्याच्या अनेक चित्रपटांचे काम अचानक बंद करण्यात आले. त्यामुळे सुशांतला संपविण्याच्या दृष्टीने ही योजनाबद्ध कट रचल्याचा संशय येतो. चित्रपट सृष्टीतून बाहेर फेकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अनेकदा सुशांतने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना सांगितले होते.शिवाय या इंडस्ट्रीत त्याला टिकवून ठेवण्यासाठी फॅन्सनी त्याचे चित्रपट मोठ्या संख्येने पाहावे अशी विनंतीदेखील तो अनेकदा फॅन्सना करत असे.' असं ट्विट तिनं केलं आहे. त्याला जगायचं होतं... दुसऱ्या ट्विटमध्ये कंगना म्हणते, 'सुशांतच्या जीवाला धोका असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा मृत्यू होण्याच्या कित्येक दिवस आधीच पोलिसांना दिली होती. त्याला चित्रपटसृष्टी सोडायची होती. अभिनय क्षेत्रापासून दूर जात त्याला कूर्गमध्ये आपलं पुढचं आयुष्य जगायचं होतं. असं सगळं असताना त्याला कुणी धमकी दिली? त्याला इतका त्रास कुणी दिला की, जगण्यापेक्षा त्याला मरणाला कवटाळणं अधिक सोपं वाटू लागलं? नैतिकतेच्या पातळीवर किंवा कायद्याच्या पातळीवर एखाद्याला आत्महत्या करण्यास उद्युक्त करणे ही देखील एका प्रकारे हत्याच आहे' असंही कंगना म्हणाली. 'एम्स'च्या अहवालाबाबत कंगनाने यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती. 'तरुण आणि विलक्षण माणसं एके दिवशी अचानक उठून स्वत:चं आयुष्य संपवत नाहीत. आपल्या जीवाला धोका असल्याचं, चित्रपटसृष्टीतून आपल्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सुशांत वारंवार सांगत राहिला. मुव्ही माफिया त्याला त्रास देत असल्याचंही तो बोलला. बलात्कार केल्याच्या खोट्या आरोपांनी देखील त्याला प्रचंड मानसिक त्रास झाला होता.' असंही कंगनानं लिहिलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ivcUlY