Full Width(True/False)

सात महिन्यानंतर कंगना परतली चित्रपटाच्या सेटवर

मुंबई:गेली सात महिने चित्रीकरणापासून दूर होती. दरम्यानच्या काळात बॉलिवूड, मुंबईबाबतच्या वादग्रस्त विधानांमुळे ती चर्चेत राहिली. आता पुन्हा एकदा ती कामावर परतत असून '' या जीवनपटाच्या चित्रीकरणात ती सहभागी होणार आहे. सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर करत तिनं ही माहिती चाहत्यांना दिली आहे. 'थलायवी'च्या चित्रीकरणासाठी ती दक्षिण भारताच्या दौऱ्यावर जात आहे. 'प्रिय मित्रांनो, आज खूप खास दिवस आहे. सात महिन्यानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात करीत आहे. माझ्या बहुभाषिक 'थलायवी' चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी दक्षिण भारतात जात आहे. महामारीच्या या कठीण काळात तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे', असं तिनं ट्विटरवर लिहिलं आहे. 'थलायवी' हा तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री जयललिता यांचा चरित्रपट आहे. याचं दिग्दर्शन ए. एल. विजय करीत आहेत. या चित्रपटाचं लेखन 'बाहुबली' आणि '' लिहिलेल्या आणि यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आधीच ठरली होती. २६ जून २०२० रोजी 'थलायवी' हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार होता, परंतु करोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण परिस्थितीच बदलली. चित्रपटगृहं बंद होती. त्यामुळे हा चित्रपट आता कधी पूर्ण होतोय आणि पुढे कधी प्रदर्शित होणार हे येणारी वेळच सांगेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34bIjEE