Full Width(True/False)

मालिकांच्या सेटवर अशी घेतली जातेय 'पोटोबा'ची खबरदारी

मुंबई टाइम्स टीम मालिकांचं चित्रीकरण सध्या वेगानं सुरू असून, त्यासाठी पडद्यामागे खूप मेहनत घेतली जातेय. तांत्रिक गोष्टी तर आहेतच, शिवाय सेटवर असणाऱ्या प्रत्येकाच्या जेवण्या-खाण्याकडेही तेवढंच लक्ष दिलं जातंय. करोना संकटामुळे सेटवरील भोजन व्यवस्थेचं चित्र नेहमीपेक्षा खूप वेगळं आहे. सोशल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण, मास्क या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेत सेटवर जेवण आणि दोन्ही वेळचा चहा-नाश्ता याची सोय केल्याचं दिसून येतंय. 'शुभ मंगल ऑनलाइन' या मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं होतं त्यावेळी अभिनेत्री यांनी रोज सकाळी १० वाजता एक काढा घ्यायच्या. सुरुवातीला त्यांनी हा काढा सगळ्यांना करून दिला. नंतर त्याची पाककृतीच टीममधल्या एकाला सांगण्यात येऊन त्यानुसार तो काढा रोज तयार केला जातो. सुकन्या यांचं चित्रीकरण नसलं, तरीही बाकीचे सगळे तो काढा घेताहेत की नाही यावर त्याचं लक्ष असतं. कधी कधी त्या स्वत: संध्याकाळचा नाश्ता सेटवर बनवतात. इतरांनाही खाता येईल या दृष्टिनं तो थोडा जास्तच बनवला जातो. अनेक कलाकार जेवणाचा स्वत:चा डबा घेऊन येतात. '', 'लाडाची मी लेक गं', '', '' या मालिकांच्या सेटवर पॅकबंद जेवण आणि दोन्ही वेळचा नाश्ता येतो. प्रत्येकाचा पॅक वेगवेगळा असतो. तर काही कलाकार स्वत:चा डबा आणतात. 'तुझं माझं जमतंय' आणि 'डॉ. डॉन' यासह इतरही काही मालिकांच्या सेटवर जेवणासाठी आचारी ठेवण्यात आले आहेत. चित्रीकरण करताना इतर गोष्टींप्रमाणे जेवणासंबंधी आवश्यक ती खबरदारी घेण्याकडेही तितकंच लक्ष दिलं जातंय. 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेचं चित्रीकरण नाशिकला असतं. बहुतांश कलाकार तिथलेच असल्यामुळे ते घरुन डबे आणतात. इतरांसाठीही घरगुती पद्धतीच्या जेवणाचे डबे येतात. तर 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'च्या सेटच्या मागच्या बाजूला मोठं कँटीन आहे. तिथेच जेवण, नाश्ता बनवला जातो. आवश्यक साहित्य, सामानाचं निर्जंतुकीकरण करून तिथे स्वयंपाक केला जातो. 'माझा होशील ना' या मालिकेच्या सेटवरही घरगुती पद्धतीचा स्वयंपाक केला जातो. काही कलाकार पूर्वी त्यांचं जेवण घरून आणायचे. आता याचं प्रमाण वाढताना दिसतंय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'सिंगिंग स्टार' या दोन कार्यक्रमात स्पर्धक जोड्या आहेत. हास्यजत्रेतील प्रत्येक जोडीला एक अशा खोल्या दिल्या आहेत. ते घरुन डबे आणत असल्यामुळे आपापल्या खोल्यांमध्ये बसून जेवतात. तर सिंगिंग स्टारच्या जोड्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून जेवतात. जेवताना गर्दी होऊ नये या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही काळजी घेतली जातेय. 'श्रीमंताघरची सून' या मालिकेच्या सेटवर बहुतांश लोक घरुन जेवणाचे डबे घरून आणतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jBXfla