Full Width(True/False)

अमिताभ यांच्यासह अनेक तारे तारकांना घातली ओटीटीनं भुरळ

मुंबई टाइम्स टीम बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सना एकेकाळी टीव्हीच्या पडद्यानं भुरळ घातली होती. यांच्यापासून धकधक गर्ल माधुरी दीक्षितपर्यंत अनेक सुपरस्टार्स छोट्या पडद्यावर अवतरले. तीच गोष्ट आता ओटीटीच्या (ओव्हर द टॉप) बाबतीत होताना दिसतेय. रुपेरी पडद्यावर स्टार असलेली ही मंडळी आता तिसऱ्या पडद्यावर येऊ लागली आहेत. यापैकी काहींनी अगोदरच डिजिटलवर अभिनयाचा आणि निर्मितीचा श्रीगणेश केला आहे. अनेक मोठे कलाकार येत्या दिवसात ओटीटीवर दमदार पदार्पण करणार आहेत. अभिनेता शाहिद कपूरनं त्याच्या आगामी बिग बजेट वेब सीरिजची घोषणा केली होती. राज-डिके या दिग्दर्शक जोडीच्या आगामी वेब सीरिजमध्ये शाहिद कपूर दिसणार आहे. अभिनेता अभिकेष बच्चनचं त्याच्या 'ब्रीद २' या वेब सीरिजमधील अभिनयासाठी कौतुक झालं होतं. एकीकडे बॉलिवूडचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असताना बड्या स्टार्सनी वेब सीरिजमध्ये उडी घेतल्यानं येत्या काळातील ओटीटी चित्र कमालीचं बदलेलं दिसणार आहे. अभिनेता मनोज बाजपेयी अभिनित 'फॅमिली मॅन' ही वेब सीरिज कमालीची हिट ठरली होती. ही वेब सीरिज देखील राज-डिके या दिग्दर्शक जोडीनंच दिग्दर्शित केली होती. त्याचप्रमाणे बिग बी अमिताभ बच्चनदेखील आगामी काळात वेब सीरिजमध्ये दिसण्याची शक्यता आहे. बिग बी खूप वेगळ्या भूमिकेत असतील. पुढील वर्षी या वेब सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं कळतंय. सैफपासून इमरान हाश्मीपर्यंत..भारतात प्रेक्षकांना ओटीटीवर खेचून आणण्याचं श्रेय 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजला द्यायला हवं. यात सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासारखे बॉलिवूडचे बडे स्टार मध्यवर्ती भूमिकेत होते. 'सेक्रेड गेम्स'चे दोन्ही सीझन कमालीचे हिट ठरले होते. आता तिसऱ्या सीझनचीदेखील प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहे. ओटीटीवर सैफ अली खानच्या निमित्तानं सुरू झालेला बड्या कलाकारांच्या आगमनाचा सिलसिला पुढे , , , या कलाकारांनी पुढे सुरू ठेवला. काही दिवसांपूर्वी आलेल्या बॉबी देओलच्या 'आश्रम' वेब सीरिजला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. अक्षयचीही एंट्रीबॉलिवूडचा सबसे बडा खिलाडी अक्षयकुमारदेखील वेब सीरिजमध्ये पदार्पण करणार असल्याचं कळतंय. 'द एड' असं या वेब सीरिजचं नाव असणार आहे. या वेब सीरिजमध्ये अक्षय अनेक खतरनाक स्टंट्स करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे 'प्राइम व्हिडिओ'बरोबर अक्षयनं या वेब सीरिजचा करार केला आहे. सध्या या सीरिजचं प्री प्रॉडक्शन सुरू असून, पुढील वर्षी त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रपटगृहाचा मोठा पडदा असो किंवा तळहातावरील ओटीटीची स्क्रीन; दोन्ही प्लॅटफॉर्ममधील अंतर आता कमी होऊ लागलं आहे. प्रेक्षकांप्रमाणेच सिनेसृष्टीतील बडे स्टारही मोठ्या संख्येनं ओटीटीकडे वळत आहेत. बॉलिवूडच्या अनेक बड्या स्टार्सनी ओटीटीवर निर्माता म्हणून याआधीच एंट्री घेतली आहे. आता ते ओटीटीवर अभिनय करतानादेखील दिसतील. सिनेसृष्टी आणि ओटीटीमधलं अंतर कमी होतंय. - कोमल नाहटा, ट्रेंड अॅनालिस्ट


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oktnxd