Full Width(True/False)

हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने शेअर केला मुलाचा फोटो

मुंबई-हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिकने सोशल मीडियावर ताजी छायाचित्रे या दिवसात चर्चेत आहेत, ज्यामध्ये ती आपल्या मुलाला आपल्या मांडीवर बसवून खेळवताना दिसत आहे. नताशा सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि ती मुलासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नताशाने मुलाला दोन महिने पूर्ण झाल्यानंतर त्याचं फोटोशूट केलं आहे. नताशा स्टॅनकोविचने मुलगा अगस्त्याबरोबरचा फोटो शेअर केल्यानंतर कॅप्शनमध्ये लिहिले की, 'अगस्त्यचे २ महिने.' नताशाने जसे अगस्त्यचे फोटो शेअर केले. त्याच्या काही मिनिटांनंतरच यूझरने कमेन्ट करायला सुरुवात केली. अनेकांनी नताशा आणि हार्दिकचं अभिनंदन केलं. एका चाहत्याने कमेन्ट करत लिहिले की, फारच क्यूट आहे तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, जास्त करून त्याच्या वडिलांसारखा दिसतो. अनेकांनी अगस्त्य हार्दिकसारखाच दिसतो असं लिहिलं. दुसरा चाहता म्हणाला की माशाल्लाह एक लहान आला आहे. नुकताच नताशाने शेअर केलेले फोटो चर्चेत होते. सध्या हार्दिक पांड्या आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. हार्दिकला पाठिंबा देण्यासाठी नताशा आणि अगस्त्य दोघांनीही मुंबई इंडियन्सची जर्सी घातली होती. या जर्सीतले फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3d3zP6M