Full Width(True/False)

जिओ युजर्संना १८०० रु सिक्योरिटी डिपॉझिट करावे लागणार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ कडून नुकतीच Postpaid Plus सर्विसची घोषणा करण्यात आली आहे. या प्लान्सची सुरुवात ३९९ रुपयांपासून १४९९ रुपयांपर्यंत आहे. हे प्लान्स सब्सक्राईबर्सला अनलिमिटेड टॉकटाइम बेनिफिट्स शिवाय डेटा रोलओवहरची सुविधा आणि फॅमिली अॅड ऑन सिम फॅसिलिटी दिली जाते. ट्रायच्या वेबसाईटवरून ही माहिती समोर आली आहे की, पोस्टपेड प्लान्सचे सब्सक्रिप्शन देणाऱ्या जिओ युजर्संना जमा करावे लागणार आहे. युजर्संना ५०० रुपये ते १८०० रुपयांपर्यंत सिक्योरिटी डिपॉझिट जमा करावे लागेल. वाचाः रिलायन्स जिओने गेल्या महिन्यात ५ पोस्टपेड प्लस प्लान्स आणले आहे. ज्यात इन फ्लाइट कनेक्टिविटी पॅक्स आणि इंटरनॅशनल रोमिंग ऑप्शन दिले आहेत. ट्रायच्या वेबसाइटवर नवीन रेग्यूलेटरी फायलिंगमध्ये म्हटले की, जिओ पोस्टपेड प्लसची मेंबर शीप घेणाऱ्या युजर्संना एक ठराविक रक्कम सिक्योरिटी डिपॉझिटी जमा करावी लागेल. रिलायन्स जिओच्या वेबसाइटवर अशा कोणत्याही सिक्योरिटी डिपॉझिटचा उल्लेख नाही. ट्रायच्या वेबसाइटवर सुद्धा छोट्या अक्षरात हे लिहिले आहे. वाचाः कोणत्या प्लानवर किती सिक्योरिटी समोर आलेल्या डिटेल्सनुसार, ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानच्या सब्सक्रायबर्सला ५०० रुपये सिक्योरिटी, ५९९ रुपयांच्या प्लान घेणाऱ्या युजर्संना ७५० रुपये, ७९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लान घेणाऱ्या युजर्संना १००० रुपये आणि ९९९ रुपयांच्या रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना १२०० रुपयांची सिक्योरिटी जमा करावी लागेल. सर्वात प्रीमियम १४९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना १८०० रुयपांची सिक्योरिटी डिपॉझिट करावे लागेल. वाचाः खूप प्लॅटफॉर्म्सचे फ्री सब्सक्रिप्शन व्हाइस कॉल आणि डेटा बेनिफिट्स शिवाय जिओ पोस्टपेड प्लस युजर्संना खूप ओटीटी प्लॅटफॉर्म्स यासारख्या Netflix, Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळणार आहे. याशिवाय, जिओच्या सर्व अॅप्सचे फ्री अॅक्सेस ऑफर केले जाणार आहे. तसेच सिलेक्टेड प्लानचे बेनिफिट जिओ पोस्टपेड प्लस सब्सक्रायबर्स आपल्या फॅमिली मेंबर्संना २५० रुपयांचे एक्स्ट्रा बेनिफइट देवू शकते. कंपनीचे सर्वात प्रीमियम प्लान १४९९ रुपयांत ३०० जीबी डेटा, ५०० जीबी डेटा रोलओवर, अनलिमिटेड व्हाईस आणि बाकी बेनिफिट्स देते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SMFOnj