नवी दिल्लीः बीएसएनएलने खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अनेक प्लान लाँच केले आहेत. कंपनीने वोडाफोन, रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या लाँग टर्म प्लान्सला टक्कर देण्यसाठी आपल्या १९९९ रुपयांच्या प्लानला रिवाईज केले आहे. आता या प्लानमध्ये एकूण १२७५ जीबी डेटा दिला जात आहे. वाचाः बीएसएनएलचा १९९९ रुपयांचा प्लान बीएसएनएलचा हा प्लान आता ३६५ दिवसांच्या ऐवजी ४२५ दिवसांची वैधतेसोबत येणार आहे. या प्लानमध्ये कंपनी रोज ३ जीबी या प्रमाणे एकूण १२७५ (३जी) डेटा ऑफर करीत आहे. रोज १०० फ्री एसएमएस सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कॉलिंग साठी २५० मिनिट्स मिळतात. प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट सोबत यात दोन महिन्यासाठी इरोस नाउचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वोडाफोन-आयडियाचे २५९५ रुपयांचा प्लान वोडाफोन-आयडियामध्ये तुम्हाला ३६५ दिवसांची वैधतेसोबत रोज २ जीब डेटा ऑफर केला जातो. प्लानमध्ये देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग फ्री मिळते. रोज १०० फ्री एसएमएस मिळणाऱ्या या प्लानमध्ये अनेक 'Weekend Data Rollover' चा फायदा मिळतो. प्लानच्या सब्सक्रायबर्सला Vi Movies & TV सोबत झी५ प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः रिलायन्स जिओचा २१२१ रुपयांचा प्लान ३३६ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जात आहे. प्लानमध्ये जिओ ते जिओ वर फ्री कॉलिंग मिळते. तर दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये १२ हजार एफयूपी मिनिट्स मिळते. रोज १०० फ्री एसएमएसच्या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देते. वाचाः एअरटेलचा २४९८ रुपयांचा प्लान लाँग टर्म वैधता असलेला एअरटेलचा हा प्लान एक चांगला पर्याय होवू शकतो. यात ३६५ दिवसांची वैधता सोबत रोज २ जीबी डेटा मिळतो. हा प्लान देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर ट्रू अनलिमिटेड कॉलिंग सोबत येतो. प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस मिळते. प्लानमध्ये एअरटेल एक्स्ट्रिम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन सोबत फास्टॅग खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34GbTny