नवी दिल्लीः स्वस्त ५जी स्मार्टफोन बनवण्याची स्पर्धा वाढली आहे. वनप्लसचा एन्ट्री लेवल ५जी फोन ला जोरदार टक्कर देण्यासाठी एन्ट्री ५जी फोन Motorola लाँच करणार आहे. वनप्लसचा एन १० ५जी २६ ऑक्टोबर रोजी अमेरिकेत लाँच करण्यात आला होता. सर्वात कमी किंमतीत ५जी फोन आहे. आता मोटोरोला सुद्धा सोबत सॅमसंग, अॅपल, हुवावे आणि शाओमीला टक्कर देण्यासाठी स्वस्त ५जी फोन आणत आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये स्पर्धा खूप वाढणार आहे. वाचाः प्रोसेसर दोन्ही फोनमध्ये सारखेच Motorola Moto G 5Gच्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकली तर कंपनी यात Qualcomm Snapdragon 690 प्रोसेसर सोबत लाँच करणार आहे. हा प्रोसेसर वनप्लस एन १० ५जी मध्ये आहे. मोटो ५जी ला ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज सोबत मार्केटमध्ये उतरवले जावू शकते. या फोनमध्ये ओलेड डिस्प्ले पॅनल असणार आहे. याचा रिफ्रेश रेड ६० हार्ट्ज आहे. तर वनप्लस ए१० ५जी मध्ये डिस्प्ले रिफ्रेश रेट ९० हार्ट्ज आहे. वाचाः मोटोजी ५ जी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा Motorola Moto G 5G च्या कॅमेऱ्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असणार आहे. ज्यात प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर Samsung GM1 सेंसर सोबत येतो. यासोबत ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा तिसरा कॅमेरा आहे. मोटो जी ५ जीमध्ये ड्यूल सेल्फी कॅमेरा आहे. वाचाः ४० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या फोनची डिमांड आगामी काही काळात अनेक कंपन्या बजेटचे ५जी स्मार्टफोन बनवण्याचे दिसत आहे. पुढील वर्षी सॅमसंग, ओप्पो, विवो सह अनेक कंपन्या स्वस्त ५जी फोन लाँच करणार आहे. कारण, ५जीची डिमांड आहे. लोकांना ४० हजारांपेक्षा कमी किंमतीत ५जी फोन खरेदी करायचा आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HJJXGj